सातारा : डेक्कन स्पाेर्टस क्लब यांच्यावतीने कोल्हापूर येथे झालेल्या Bergman 113 स्पर्धेत साता-यातील निष्णात क्रीडापटू डॉक्टर सुधीर पवार यांनी ४१ ते ५० वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला तसेच संपूर्ण स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. डाॅ. पवार यांच्या यशाबद्दल साता-यातील (Satara) क्रीडाप्रेमींसह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
ही स्पर्धा पाेहणे (swimming), सायकलिंग (cycling) तसेच धावणे (running) (ट्रायथलाॅन) अशा तीन टप्प्यात पार पाडायची हाेती. यामध्ये देशातील ९०० खेळाडू सहभागी झाले हाेते. राजाराम तलावात १.९ किलाेमीटर पाेहणे त्यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग (तवंडी घाटापर्यंत) तेथून लगेच २१ किलोमीटर धावणे असे हे तीन टप्पे हाेते.
ही स्पर्धा पाच तास ५५ मिनिटात पूर्ण करून डॉक्टर पवार यांनी यश मिळवले. त्यांना शिव यादव तसेच जयंत शिवदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कडाक्याच्या थंडीत पोहणे तसेच खूप रहदारी असलेल्या महामार्गावर सायकलिंग आणि ३५ डिग्री तापमान असताना धावणे अशी ही खडतर स्पर्धा डाॅ. पवार यांनी जिंकत काेल्हापूरवासियांसह सातारकरांची (satara) मने जिंकली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.