Fastest Fifty In T20I Twitter
क्रीडा

Fastest Fifty In T20I: १६ वर्षांनंतर मोडला युवराजचा रेकॉर्ड, नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या ९ चेंडूत ठोकलं अर्धशतक; पाहा VIDEO

Ankush Dhavre

Dipendra Singh Airee Breaks Yuvraj Singh Record:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज युवराज सिगंने २००७ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत १२ चेंडूंचा सामना करत अर्घशतक झळकावले होते. इंग्लंडविरूद्ध झालेल्या या सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते.

हा रेकॉर्ड गेल्या १६ वर्षांत कुठल्याही फलंदाजाला मोडता आला नव्हता. अखेर १६ वर्षांनंतर नेपाळच्या फलंदाजाने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळ आणि मंगोलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी घुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले आहे. नेपाळ संघातील फलंदाज दिपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या ९ चेडूंचा सामना करत अर्धशतक पू्र्ण केलं आहे.

या खेळीदरम्यान त्याने ८ षटकार मारले आहेत. या खेळीसह त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या खेळीदरम्यान त्याने १० चेंडूंचा सामना करत ८ षटकारांच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली आहे.

कुशल मल्लाने मोडला सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड..

दिपेंद्र सिंग ऐरीने सर्वात जलद अर्धशतक झळकावल्यानंतर कुशल मल्लाने सर्वात शतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने या सामन्यात अवघ्या ३४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

यापूर्वी हा रेकॉर्ड रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरच्या नावे होता. या दोघांनी ३५-३५ चेंडुंचा सामना करत शतक पू्र्ण केलं होतं. कुशलच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५० चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि १२ षटकारांच्या साहाय्याने १३७ धावांची खेळी केली आहे. (Latest sports updates)

नेपाळ विरूद्ध मंगोलिया सामन्यात बनवले गेले हे मोठे रेकॉर्ड...

सर्वात जलद शतक - कुशल मल्लाने ३४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं आहे.

सर्वात जलद अर्धशतक- दिपेंद्र सिंग ऐरीने ९ चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

सर्वात मोठी धावसंख्या - २० षटकअखेर ३१४ धावा

सर्वाधिक षटकार - २४ षटकार

सर्वात मोठा विजय- २७३ धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT