Asian Games 2023: चीनमध्ये नेपाळचा धमाका! फास्टेस्ट फिफ्टी, फास्टेस्ट सेंच्यूरी करत मोडले सगळेच रेकॉर्ड

Nepal vs Mongolia Records: मंगोलियाविरूद्धच्या सामन्यात नेपाळने मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
nepal vs monogolia asian games 2023 nepal cricket team and its player dipendra singh airee and kushal malla creates 5 world record
nepal vs monogolia asian games 2023 nepal cricket team and its player dipendra singh airee and kushal malla creates 5 world recordSaam tv news
Published On

Records Made By Nepal In T20I Cricket:

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळच्या पुरुष क्रिकेट संघाने धुमाकूळ घातला आहे. मंगोलियाविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात नेपाळच्या २ फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

नेपाळ क्रिकेट संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जलद शतक आणि जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड देखील याच सामन्यात बनवला गेला आहे.

nepal vs monogolia asian games 2023 nepal cricket team and its player dipendra singh airee and kushal malla creates 5 world record
IND vs AUS, Weather Update: राजकोट वनडे सामना पावसामुळे धुतला जाणार? पाहा कसं असेल हवामान

आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात नेपाळ आणि मंगोलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळ क्रिकेट संघाने ३ गडी बाद ३१४ धावांचा डोंगर उभारला.

टी-२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा पल्ला गाठणारा नेपाळ हा पहिलाच संघ ठरला आहे. तसेच या सामन्यात नेपाळने २७३ धावांनी विजय मिळवला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा सर्वात मोठा विजय आहे.

या सामन्यात नेपाळने मंगोलियाला विजयासाठी ३१५ धावांचे आव्हान दिले होते.या धावांचा पाठलाग करताना मंगोलियाला केवळ ४१ धावा करता आल्या.

या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी एकुण २६ षटकार खेचले आहेत. यासह नेपाळचा संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच डावात सर्वाधिक षटकार खेचणारा संघ ठरला आहे. यापूर्वी वेस्टइंडीज आणि अफगाणिस्तान यांच्या नावे २२-२२ षटकार मारण्याचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड आता नेपाळने मोडून काढला आहे.

सर्वात जलद शतक, सर्वात जलद अर्धशतक..

नेपाळ संघातील फलंदाज कुशल मल्लाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठोकलं आहे. त्याने या सामन्यात केवळ ३४ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं आहे. यापूर्वी सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा डेव्हिड मिलर आणि रोहित शर्माच्या नावे होता.

दोघांनी ३५-३५ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं होतं. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्डही या सामन्यात मोडला गेला आहे. नेपाळ संघातील दिपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या ९ चेंडूंचा सामना करत ८ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. (Latest sports updates)

nepal vs monogolia asian games 2023 nepal cricket team and its player dipendra singh airee and kushal malla creates 5 world record
IND vs AUS 3rd ODI: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रयोग; ३ अष्टपैलू अन् दोन गोलंदाजांशिवाय उतरणार मैदानात

नेपाळ विरूद्ध मंगोलिया सामन्यात बनवले गेले हे मोठे रेकॉर्ड...

सर्वात जलद शतक - कुशल मल्लाने ३४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं आहे.

सर्वात जलद अर्धशतक- दिपेंद्र सिंग ऐरीने ९ चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

सर्वात मोठी धावसंख्या - २० षटकअखेर ३१४ धावा

सर्वाधिक षटकार - २४ षटकार

सर्वात मोठा विजय- २७३ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com