आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३० व्या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर ३ गडी बाद २८७ धावा केल्या. (Dinesh Karthik longest six)
यादरम्यान हैदराबादच्या फलंदाजांनी १९ चौकार आणि २२ षटकार मारले. तर प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी ७ गडी बाद २६२ धावा केल्या. या संघातील फलंदाजांनी २४ चौकार आणि १६ षटकार मारले. या संपूर्ण सामन्यात एकूण ३८ षटकार मारले गेले. यादरम्यान दिनेश कार्तिकने मारलेला १ षटकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ज्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
दिनेश कार्तिकने मारला सर्वात लांब षटकार..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज दिनेश कार्तिकने या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला आहे. त्याने १०८ मीटर लांब षटकार मारला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर जाऊन पडला. यापूर्वी वेंकटेश अय्यर आणि निकोलस पुरन यांनी या हंगामात १०६ मीटरचा षटकार मारला आहे. हे दोन्ही फलंदाज संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी कायम आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशन तिसऱ्या स्थानी आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात १०३ मीटर लांब षटकार मारला होता.
यासह कोलकाता नाईट रायडर्स संघातील विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने १०२ मीटरचा षटकार मारला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या युवा फलंदाज अभिषेक पॉरेलने १०० मीटरचा षटकार मारला आहे.
हा षटकार त्याने पंजाब किंग्जविरुध्द झालेल्या सामन्यात खेचला होता. सध्या या हंगामात सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत दिनेश कार्तिक अव्वल स्थानी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.