Rohit Virat controversy saam tv
Sports

Rohit Virat controversy: रोहित शर्मा, विराट कोहलीला निवृत्ती घ्यायला भाग पाडलं का? बीसीसीआयनं अखेर सोडलं मौन

Rohit Sharma Virat Kohli retirement: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतंच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. यानंतर बीसीसीआयने या दोघांना निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं असं म्हटलं जात होतं. मात्र यावर आता राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकाच वेळी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली.

  • बीसीसीआय किंवा कोच गौतम गंभीर यांच्या दबावामुळे निवृत्ती घेतली या चर्चांना राजीव शुक्लांनी पूर्णविराम दिला.

  • दोघंही ODI साठी उपलब्ध असणार असल्याचं BCCI ने स्पष्ट केलं आहे.

नुकतंच टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकाच वेळी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. दोघांच्याही अचानक घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. इंग्लंड दौऱ्याच्या आधीच त्यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली जे अनेकांसाठी अनपेक्षित ठरलं. भारताने 2007 नंतर इंग्लंडमध्ये एकही टेस्ट सिरीज जिंकलेली नाही.

BCCI वर दबावाचे आरोप?

या निवृत्तीमागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा काही हस्तक्षेप होता का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र अशातच आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हे सर्व स्पष्ट केलं आहे.

राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, ही दोघांची स्वतःची इच्छा होती. बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्यास सांगत नाही. आम्हाला देखील दोघांची कमतरता जाणवते. पण हे त्यांचा स्वतःचा निर्णय होता,”

रोहित शर्माने घेतली पहिल्यांदा निवृत्ती

रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी पोस्ट करत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 38 वर्षांचा रोहित 67 टेस्ट सामन्यांमध्ये भारतासाठी खेळला असून, त्याने 4301 रन्स केले आणि सरासरी 40.57 अशी होती. मात्र गेल्या काही काळात त्याचा फॉर्म फार खराब होता. न्यूझीलंडविरुद्ध सिरीजमध्ये आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सिरीजमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आला नाही.

विराट कोहलीने दिली भावनिक निरोपाची पोस्ट

रोहितनंतर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं. यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलं की, "आता नवीन पिढीला पुढे जाण्याची वेळ आहे." कोहलीने 123 टेस्ट सामन्यांमध्ये 9230 रन्स केले असून त्यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.

कोहली आणि रोहितच्या निवृत्तीनंतर चर्चा

रोहित आणि विराट या दोघांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर चर्चा सुरु झाल्या की, बीसीसीआयने दबाव आणला होता. पण राजीव शुक्लांनी या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. “ते दोघेही महान फलंदाज आहेत आणि ODI फॉरमॅटसाठी ते दोघंही उपलब्ध असणार आहेत. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे,” असंही शुक्ला पुढे म्हणाले.

इंग्लंडमध्ये युवा टीमची कामगिरी उल्लेखनीय

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एक तरुण भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट, रोहित आणि अश्विनशिवाय खेळत असताना देखील टीम चांगली कामगिरी करतेय. भारत सध्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत 1-2 ने पिछाडीवर आहे, पण आत्तापर्यंतच्या एकूण सामन्यांमध्ये भारताने इंग्लंडपेक्षा अधिक सत्रांवर वर्चस्व मिळवलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कोणत्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली?

त्यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत BCCI ने काय स्पष्ट केलं?

रोहित-विराट या दोघांची वैयक्तिक इच्छा होती, BCCI ने कोणताही दबाव टाकलेला नाही.

रोहित आणि कोहलीने टेस्टमध्ये किती धावा केल्या?

रोहितने 67 टेस्टमध्ये 4301 धावा, तर कोहलीने 123 टेस्टमध्ये 9230 धावा केल्या.

रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर भारताची टेस्ट टीम कोणाच्या नेतृत्वाखाली खेळतेय?

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताची युवा टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.

विराट आणि रोहित आता कोणत्या फॉरमॅटसाठी उपलब्ध आहेत?

ते दोघंही ODI फॉरमॅटसाठी उपलब्ध राहतील, असं BCCI ने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT