स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे पुढे ढकलण्यात आलं.
काही दिवसांनी पलाशसोबत एका महिलेचे फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना सुरुवात झाली.
हे स्क्रीनशॉट खरे की खोटे याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर पलाशवर टीका होत असली तरी काही युजर्स पलाशला कठीण काळात एकटे सोडण्याची मागणी करत आहेत.
Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding News : भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न स्थगित करण्यात आले. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. पलाशची बहीण आणि स्मृतीचे व्यवस्थापक तहन मिश्रा यांनी श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बरं झाल्यानंतरच लग्न केले जाईल, असे सांगितले. स्मृती-पलाश यांनी आपले लग्न पुढे ढकलले. आता हे लग्न पुढे ढकलण्यामागे वेगळेच कारण असल्याचे वृत्त समोर येत आहे. पलाश स्मृतीची फसवणूक करत असल्याचा दावा केला जातोय. पलाश नावाच्या एका व्यक्तीचे फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले आहेत. त्यानंतर वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. (Did Palash Muchhal cheat on Smriti Mandhana? Viral screenshots raise questions about delayed wedding)
स्मृती-पलाश यांचं लग्न अचानक पुढे ढकलले, त्याला आता धक्कादायक वळण लागलेय. पलाशचे एका महिलेसोबतचे फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पलाशची बहीण गायिका पलक हिने इन्स्टाग्रामवर लग्न पुढे ढकलण्याचे कारण सांगितले. पण त्यानंतर काही वेळातच रेडिटवर एका महिलेचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. त्यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ उडाला.
मेरी डी’कोस्टा या महिलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर पलाशसोबत झालेल्या तिच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. त्यामध्ये पलाश स्मृतीसोबतच्या त्याच्या ‘लॉन्ग डिस्टेन्स’ आणि त्यांच्या "टूर्स" बद्दल उघडपणे बोलताना दिसतोय. पलाशने मेरीचे कौतुक केले अन् तिला स्विमिंग, स्पा आणि सकाळी ५ वाजता मुंबईतील वर्सोवा बीचवर भेटण्यासाठी बोलवले. मेरीने पलाशला स्मृती आवडते का? असा प्रश्न केला त्यावेळी त्याने उत्तर देणं टाळल्याचे दिसतेय.
हे चॅट्स व्हायरल झालेले आहेत, हे खरे आहेत का, याबाबत अधिकृत माहिती नाही. पण ते चॅट्स रेडिट थ्रेडवर झपाट्याने व्हायरल झाले. काही युजर्सने पलाश याचे एका कोरिओग्राफरशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केलाय. लग्न रद्द झाल्यानंतर पलाशला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. तर काहींनी कठीण काळात पलाशला एकटे सोडण्याचा सल्ला दिलाय. एका रेडिट युजर्सने म्हटले की "स्मृती एक मजबूत आणि खणखर महिला आहे, परंतु हा विश्वासघात सहन करणे कठीण होईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.