उमेदवार नितीन वाघमारे यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात असताना मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
वाघमारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करून वॉर्ड क्रमांक १० मधून उमेदवारी दाखल केली होती.
त्यांच्या निधनानंतर वॉर्ड १० ची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजय सोनवणे, साम टीव्ही मराठी
Nitin Waghmare Latest News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा ऐन प्रचारात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मनमाडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नितीन वाघमारे यांचे आज मध्यरात्री हार्ट अटॅकचा झटका आल्याने निधन झाले आहे. वाघमारे यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते, पण त्याआधीच वाघमारे यांचे निधन झाल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मनमाड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच एक दुःखद घटना घडली आहे. मनमाड शहरातील गायकवाड चौक मधील राहवासी आणि वार्ड क्रमांक १० मधील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाले. मध्यरात्री हार्ट अटॅकच्या झटक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने वार्ड क्रमांक १० मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनमाड नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नितीन वाघमारे यांनी दिवसरात्र काम सुरू केले होते. वाघमारे यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली होती. नितीन वाघमारे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. तेव्हापासून त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली होती. त्यांनी शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक १० मध्ये अर्ज भरला होता. पण काळाने घात केला अन् मतदानाच्या आठवडा आधीच त्यांचं निधन झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.