Local Body Election : भाजपचा पुन्हा शिंदेंना धक्का, नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला, जय महाराष्ट्र करत घेतलं कमळ हातात

Fulambri Local Body Election : फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे फुलंब्रीतील राजकीय समीकरणे बदलत असून भाजपची ताकद वाढली आहे.
Fulambri Nagar Panchayat polls
Fulambri Nagar Panchayat pollsSaam
Published On
Summary
  • फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी अर्ज मागे घेतला.

  • अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

  • त्यांच्या कन्या पूजा ढोके यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

  • या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली असून शिंदे गटात मोठी खळबळ माजली आहे.

Fulambri Nagar Panchayat polls, tension between BJP and Shinde camp : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोकेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर काही तासातच त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि प्रभाग दोनच्या उमेदवार पूजा ढोके यांनीही अर्ज मागे घेतला. फुलंब्रीत 9 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिंदेसेनेचे केवळ चार उमेदवार शर्यतीत राहिलेत आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचाच उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या आनंदा ढोके यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे.

Fulambri Nagar Panchayat polls
Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदर राज्यात युतीमध्ये सोबत असलेल्या शिवसेना-भाजप मधीलच शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके हे भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे फुलंब्रीत भाजपची ताकद वाढली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आनंदा किसन ढोके यांनी आपली उमेदवारी मागे घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Fulambri Nagar Panchayat polls
Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

या सोबतच प्रभाग दोनमधून उमेदवारी दाखल केलेल्या त्यांच्या कन्या पूजा आनंदा ढोके यांनीदेखील आपला अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाने ०९ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत सहा उमेदवारांनी माघार घेतली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील बाहेर पडल्यानंतर आता फक्त चार जागांवरच शिंदे गट शर्यतीत राहिला आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत सध्या भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. शिवसेना स्वतंत्र लढवत आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहेत. २ तारखेला मतदान होणार आहे, तर ३ तारखेला निकाल लागणार आहे.

Fulambri Nagar Panchayat polls
BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com