Dhoni gets angry saam tv
Sports

MS Dhoni: पराभवानंतर धोनीला राग अनावर; भर मैदानात अंपायरवर संतापल्याचा Video समोर, काय होतं कारण?

MI vs CSK: मुंबई इंडियन्सने यंदाच्या सिझनमधील पहिल्या पराभवाचा वचपा काढलाच. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईने चेन्नईचा ९ विकेट्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर धोनी मैदानावरील अंपायरवर काही कारणास्तव संतापला होता.

Surabhi Jayashree Jagdish

कॅप्टन बदलून देखील चेन्नई सुपर किंग्जच्या नशीबात काही फारसा फरक पडल्याचं दिसत नाहीये. रविवारी रात्री झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात धोनीच्या टीमला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या सिझनमधील हा चेन्नईला सहावा पराभव होता. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या झुंजार खेळीपुढे सीएसकेच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. ९ विकेट्सने झालेल्या पराभवानंतर CSK चा कर्णधार धोनी संतापलेला दिसला.

मुंबई इंडियन्सने चेन्नईचा ९ विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. रोहित आणि सूर्याने अर्धशतक झळकावत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. दरम्यान विजयानंतर धोनी मैदानावरील अंपायरशी बोलत होता. यावेळी तो संतापला असल्याचं म्हटलं जातंय.

वानखेडे मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला पहिल्यांदा फलंदाजीचं आमंत्रण दिलं. फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमला काही फारशी चांगली सुरुवात करता आली नाही. अखेरीस शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाच्या खेळीच्या जोरावर टीमचा स्कोर १७६ रॅन्सपर्यंत गेला. मात्र टार्गेट डिफेंज करताना चेन्नईची टीम पूर्णपणे फेल गेली.

अंपायरवर का संतापला धोनी?

मुंबईची टीम फलंदाजी करत असताना १४ व्या ओव्हरमध्ये धोनी आणि अश्विनने अंपायर्सकडे नियमांनुसार नव्या बॉलची मागणी केली. मात्र यावर अंपायरन नकार दिला. ज्यावरून धोनी, अंपायर आणि अश्विन यांच्यामध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. अंपायरने नवा बॉल सीएसकेच्या टीमला दिलाच नाही. याचाच राग धोनीने पराभवानंतर अंपायरवर काढल्याचं म्हटलं जातंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्लेऑफ गाठू शकते चेन्नई?

मुंबई विरूद्धचा सामना हा चेन्नईसाठी 'करो या मरो'चा होता. दरम्यान सीएसकेकडे अजूनही सहा सामना बाकी आहेत. जर त्यांना प्लेऑफमध्ये जागा हवी असेल तर पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहे. एक पराभव देखील सीएसकेचं पूर्ण समीकरण बिघडवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT