Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce saam tv
Sports

It's Official! 4 वर्षांनंतर धनश्री-युजवेंद्र चहल झाले वेगळे; 'या' कारणाने झाला दोघांचाही घटस्फोट

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: असा दावा करण्यात आलाय की, की दोघेही गेल्या १८ महिन्यांपासून म्हणजेच दीड वर्षांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्रीचं लव्ह मॅरेज झालं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा कायदेशीररीत्या वेगळे झाले आहेत. म्हणजेच त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र आता दोघांनीही घटस्फोट घेतला आहे.

चहल आणि धनश्री हे दोघंही डिसेंबर २०२० मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांचाही घटस्फोट झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये, असा दावा करण्यात आलाय की, की दोघेही गेल्या १८ महिन्यांपासून म्हणजेच दीड वर्षांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्रीचं लव्ह मॅरेज झालं होतं.

काऊंसिलिंग सेशनचाही उपयोग झाला नाही

एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांना मुंबईतील वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टातून घटस्फोटाचं प्रमाणपत्र मिळणार आहे. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी दोघांनाही ४५ मिनिटं काउंसलिंग सेशन केलं. न्यायाधीशांनी घटस्फोटाबद्दल विचारलं तेव्हा चहल आणि धनश्री म्हणाले की, ते दोघंही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहेत.

काय आहे घटस्फोटाचं कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान चहल आणि धनश्री यांनी सांगितलं की, ते दोघेही गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहतायत. जेव्हा त्यांना घटस्फोटाचं कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांच्यात गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. या चर्चेनंतर, न्यायाधीशांनी दोघांनाही घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीशांनी दोघांनाही विवाहबंधनातून मुक्त केलंय.

घटस्फोटानंतर सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "देवाने मला मोजता येत नाही इतक्या वेळा वाचवलंय. त्यामुळे मी किती वेळा वाचलो हे मला आठवतंय. मी तिथे आहे हे मला माहित नसतानाही माझ्यासाठी नेहमीच उपस्थित राहिल्याबद्दल देवाचे आभार," असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT