Delhi Capitals (DC) vs Mumbai Indians  Saam tv
Sports

DC vs MI: तीन 'रन आऊट' आणि सामना फिरला; मुंबईनं अपराजित दिल्लीला नमवलं, MIची पॉईट्स टेबलमध्ये मोठी झेप

Delhi Capitals (DC) vs Mumbai Indians : आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले होते. मुंबईच्या संघाने मोठा विजय मिळवला.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आमने सामने आले होते. हे दोन्ही संघांचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य दिलं होतं. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरूवात विकेटने झाली. जेक फ्रेझरच्या रुपात पहिला धक्का बसला. मात्र दिल्लीकडे गेलेला सामना अखेरच्या १५ चेंडूंमध्ये फिरला. दिल्लीच्या तीन खेळाडूंना रनआऊट करत मुंबईच्या शिलेदारांनी दिल्लीला नमवलं.

मु्ंबई इंडियन्सच्या संघाने दिल्लीसमोर विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संपूर्ण संघ १९ षटकांत १९३ धावांवरच बाद झाला. दरम्यान आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिलाच पराभव होता. सलग चार सामने दिल्ली कॅपिटल्सने जिंकले होते. पण आजच्या अटातटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या या विजयामुळे एमआयच्या संघाने पॉईंट्स टेबलवर मोठी झेप घेतलीय. तालिकेत अगदी तळाशी असलेल्या मुंबईने थेट सातव्या स्थानी भरारी घेतलीय.

तीन रनआउट्समुळे दिल्लीचा गेम झाला

लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली कारण त्यांनी पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर-मॅकगर्कची विकेट गमावली होती. त्याला दीपक चहरने बाद केलं होतं. जेक बाद झाल्यानंतर करुण नायर 'इम्पॅक्ट सब' म्हणून मैदानावर आला. त्याने अभिषेक पोरेलसोबत जबरदस्त भागीदारी केली. नायरने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. नायर आणि पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी करत दिल्लीचा डाव मजबूत स्थितीत आणाला.

पण मुंबईच्या 'इम्पॅक्ट सब' कर्ण शर्माने पोरेलला बाद करत त्यांच्यातील भागीदारी मोडली. पोरेलनेही धमाकेदार खेळी केली होती. त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. अभिषेक पोरेल बाद झाल्यानंतर करुण नायरही काही वेळात बाद झाला. करुणने आपल्या संपूर्ण खेळीत ४२ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. करुण नायरला मिचेल सँटनरने बोल्ड करत बाद केलं. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल मैदानात आला त्याने ९ धावा केल्या. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने १ धाव घेतली आणि बाद झाला.

दिल्लीच्य कर्णधाराला जसप्रीत बुमराहने तर स्टब्सला कर्ण शर्माने बाद केलं. त्यानंतर १६ व्या षटकात कर्ण शर्माने केएल राहुलची विकेट घेतली. राहुलची विकेट गेल्याने दिल्लीची चिंता वाढली होती. त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम यांच्यावर होती, पण विप्राजला फिरकी गोलंदाज मिशेल सँटनरने स्टंप आउट केले. विप्राज बाद झाला तेव्हा स्कोअर चार बाद १८० धावा असा होता.

दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या २ षटकांत जिंकण्यासाठी २३ धावा करायच्या होत्या. परंतु १९ व्या षटकात दिल्लीचे तीन खेळाडू रनआऊट झाले. बुमराहच्या षटकात आशुतोष शर्मा, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा रनआऊट झाल्याने मुंबईने दिल्लीला पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT