Sports

IPL 2024 DC vs KKR : केकेआरने उभारला धावांचा डोंगर; दिल्लीच्या संघासमोर २७३ धावांचे लक्ष्य

IPL 2024 DC vs KKR : आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आहेत. विशाखापट्टणममध्ये कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders KKR Score :

आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातोय. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोलकताच्या फंलदाजींनी दिल्लीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. केकेआरच्या संघाने २० षटकात ७ गडी गमावत २७२ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला २७३ धावा कराव्या लागतील. (Latest News)

दरम्यान आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. हैदराबादने याच हंगामात २७ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ गडी गमावून २७७ धावा केल्या होत्या. तसेच, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्जविरुद्ध ५ विकेट्सवर २४५ धावा केल्या होत्या. हा सामना १२ मे २०१८ रोजी इंदौरमध्ये झाला होता. केकेआरने हा सामना ३१ धावांनी जिंकला होता.

नारायणने अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. सुनिलने दिल्लीच्या सर्व गोलंदाजांची जोरदार धुलाई. मैदानाच्या चौफेर बाजुला फटकेबाजी केली.नारायण या हंगामामधील सर्वोधिक धावांची खेळी केली. नारायणने अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला सर्वाधिक धुलाई केली. सुनिल नारायणने इशांत शर्माच्या एका षटकात तब्बल २६ धावा ठोकल्या. फिल सॉल्टचा विकेट गेल्यानंतर सुनिल नारायण आणि अंगकृश रघुवंशी यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

या सामन्यात सुनिल नारायण कोलकाताकडून ३९ चेंडूत ८५ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यानंतर रघुवंशी याने २७ चेंडूत ५४ धावा केल्या. रघुवंशीचे हे आयपीएलमधील अर्धशतक आहे. त्यानंतर आंद्रे रसेलने १९ चेंडूत ४१ धावांची तर रिंकू सिंगने ८ चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

Bombay Stock Exchange : स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवण्याची धमकी, बिल्डिंगमध्ये ४ RDX बॉम्ब ठेवल्याचा ई मेल, पोलीस अलर्ट मोडवर

Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

SCROLL FOR NEXT