IPl 2024 DC vs SRH  x Ipl
Sports

IPl 2024 DC vs SRH : दिल्लीत चौकार-षटकारांचा पाऊस; हेड-शर्माची धुव्वाधार खेळी; दिल्लीपुढे २६७ धावांचं आव्हान

Delhi Capitals and Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये होतोय. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

Delhi Capitals and Sunrisers Hyderabad IPl 2024: इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये होतोय. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्याच चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांनी धुलाई सुरू केली. या दोघांनी रुद्र रुप धारत ५ षटकातच १०० धावा पार केल्या. या सामन्यात हेडने अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हेड ३२ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. दरम्यान हैदराबादने २० षटकात ७ विकेट गमावत २६६ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला २६७ धावा कराव्या लागतील.

हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजाचे रुद्ररुप पाहून हैदराबाद २० षटकात ३०० धावांचा पल्ला गाठेल, असं वाटत होतं. परंतु दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादवने दोन्ही सलामीवीर फलंदाजाला बाद केल्यानंतर हैदराबादच्या धावसंख्याला ब्रेक लागला. डावाच्या मध्यात दिल्लीने फक्त ८० धावा देत ४ विकेट मिळवल्या. सध्या राज्यात अवकाळी पाऊसाने धुमसान घातलंय तिकडे दिल्ली हैदराबादच्या फलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांनी वादळी खेळी करत दिल्लीच्या स्टेडियमवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

हैदराबादने आपल्या डावात २२ षटकार आणि १८ चौकार लगावत दिल्लीपुढे धावांचा डोंगर उभारला. हैदराबाचे सलामीवीर हेड आणि अभिषेक शर्माच्या धुव्वाधार फटकेबाजीचने अवघ्या ५ षटकात १०० धावा पार केल्या होत्या. दोघांची फलंदाजी पाहता दिल्लीत हैदराबाद धावांचा विक्रम करेल, असं वाटत होतं.

परंतु कुलदीप यादवने हेडला ८९ धावांवर बाद करत हैदराबादच्या धावांच्या घोडदौडला ब्रेक लावला. हेड बाद केल्यानंतर यादवने अभिषेक शर्माला ४६ धावांवर रोखत दिल्लीपुढील आव्हान कमी करण्यात मदत केली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर मार्करन मैदानात आला. परंतु तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. डावाच्या मध्यात दिल्लीने हैदराबादचे धावांना ब्रेक लावला. त्यानंतर शाहबाजने अर्धशतक करत संघाला २६६ धावांपर्यंत नेले.

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने ८९ धावा केल्या तर शाहबाज अहमदने ५९ धावांची नाबाद खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने ४६ तर नितीश रेड्डीने ३७ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवला ४ तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक यश मिळाले. परंतु या सामन्यात पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य नव्हता आणि दिल्लीचे सर्व गोलंदाज चांगलेच महागात पडलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJI Attack : देश जाती, धर्मावर चालतो... संविधान मला मान्य नाही; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

SCROLL FOR NEXT