Footballer Death x
Sports

Death : हल्ल्यात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, वयाच्या ४१ वर्षी दुर्देवी अंत; क्रीडाविश्वात हळहळ

Death News : इस्रायलच्या हल्ल्यामध्ये पॅलेस्टाईन फुटबॉल संघाचा माजी कर्णधाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण गाझामध्ये हा फुटबॉलपटू मदतीची वाट पाहत होता, तेव्हा इस्रायलने हल्ला केला.

Yash Shirke

  • प्रसिद्ध फुटबॉलपटू सुलेमान अल ओबैदचा गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला.

  • पॅलेस्टाईनचा पेले म्हणून अशी त्याची ओळख होती. तो राष्ट्रीय फुटबॉल संघाचे कर्णधार होता.

  • गाझा पट्ट्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाला. या हल्ल्यात सुलेमान अल ओबैद मारला गेला.

Footballer Death : पॅलेस्टाईनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले आहे. गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हा फुटबॉलपटू मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पॅलेस्टाईनध्ये हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यात सुलेमान अहमद जैद अल-ओबैदचा मृत्यू झाला. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशननुसार, दक्षिण गाझा पट्टीत मदतीची वाट पाहताना त्याचे निधन झाले.

सुलेमान अहमद जैद अल-ओबैदला 'पॅलेस्टाईन देशाचा पेले' म्हणून चाहते ओळखत असत. पीएफएच्या माहितीनुसार, गाझाच्या खादमत अल-शाती क्लबचे माजी स्टार फुटबॉलपटू सुलेमान अल-ओबैद यांनी पॅलेस्टाईनसाठी २४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकूण कारकिर्दीमध्ये त्यांनी १०० पेक्षा जास्त गोल केले आहेत.

६ ऑगस्ट रोजी दक्षिण गाझा पट्टीमध्ये सुलेमान अल-ओबैद हा मदतीची वाट पाहत उभे होते. यादरम्यान इस्रायलाने हल्ला केला. या हल्ल्यात सुलेमान अल-ओबैद मारला गेला. सुलेमान अल-ओबैद हा १९६७ पासून इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील अल-अमारी युथ सेंटर क्लबकडून खेळला होता. पॅलेस्टिनी फुटबॉल विश्वात तो लोकप्रिय खेळाडूंपैकी एक होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे गाझा युद्ध सुरु झाल्यापासून क्रीडा क्षेत्रातील तब्बल ६६२ लोक मारले गेले आहेत, तर फुटबॉल खेळाशी संबंधित ३२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास-शासित प्रदेशातील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझातील किमान ६१,२५८ लोक मारले गेले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ च्या इस्रायली हल्ल्यात १,२१९ लोक मारले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation GR : मराठा आरक्षणासाठीचा जीआर हाकेंनी फाडला, पुण्यात मौन आंदोलन

Nandurbar Politics : निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांसह युवा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Traveling during periods: मासिक पाळीमध्ये प्रवास अधिक सोपा कसा होईल? स्वतःची काळजी घेण्यासाठी आवश्यक वस्तू सोबत ठेवा

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध; रायगडमधून विशेष एसटी सेवा

Priya Bapat: प्रिया बापट प्रेग्नंट? सोशल मीडियावर त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT