mitchell starc twitter
Sports

DC vs SRH, Highlights: स्टार्कचा जोरदार 'पंच', हैदराबाद गारद; 300 पार सोडाच, 200 चा आकडाही पार करता आला नाही

DC vs SRH 1st Innings Highlights: विशाखापट्टणमच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

होम ग्राऊंडवर खेळताना दिल्लीच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीवर चांगलच नियंत्रण ठेवलं. आक्रमक फलंदाजांची फौज असलेल्या हैदराबादला सुरुवातीलाच एकापाठोपाठ मोठे धक्के बसले. स्टार्क, कुलदीप यादवच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ३०० धावांची स्वप्न घेऊन मैदानात आलेल्या हैदराबादचा डाव १६३ धावांवर संपुष्टात आला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १६४ धावांची गरज आहे.

विशाखापट्टणममध्ये सुरु असलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची जोडी मैदानावर आली. अभिषेक शर्माला बाद करण्यासाठी दिल्लीच्या गोलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाही.

हेड आणि अभिषेक यांच्यात झालेल्या चुकीच्या कॉलिंगमुळे दिल्लीला फायदा झाला आणि अभिषेक शर्मा धावबाद होऊन माघारी परतला. अभिषेक १ धाव करत तंबूत परतला. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी ट्रेविस हेडवर होती. त्याने १२ चेंडूंचा सामना करत २२ धावांची खेळी केली. तर पहिल्या सामन्यातील शतकवीर इशान किशन २ धावा करत तंबूत परतला. नितिश कुमार रेड्डीला तर खातंही उडतला आलं नाही.

सुरुवातीला ४ मोठे धक्के बसल्यानंतर युवा फलंदाज अनिकेत वर्माने दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने ३९ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. तर हेनरिक क्लासेनने ३२ धावा चोपल्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिंस (कर्णधार), ईशान किशन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अंकित वर्मा, हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक मनोहर, झे. अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी,

दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, जॅक फ्रेझर, फाफ डुप्लेसी, अभिषेक पॉरेल, त्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT