Delhi Capitals vs Rajasthan Royals  
क्रीडा

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२धावांचे आव्हान

Delhi Capitals vs Rajasthan Royals : आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आलेत. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आलेत. हे दोन्ही संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन हात करत आहेत. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी घराच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानसमोर २० षटकात ८ विकेट गमावत २२२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकात ८ विकेट गमावत २२१ धावा केल्या. त्यासाठी अभिषेक पोरेलने ३६ चेंडूत ६५ धावा आणि जेक फ्रेझर मॅकगर्कने २० चेंडूत ५० धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना रविचंद्रन अश्विनने ३ बळी घेतले.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला जॅक फ्रेझर मॅकगर्कने तुफानी सुरुवात करून दिली. फ्रेझर सुरुवातीपासूनच लयीत दिसला आणि त्याने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेतला. दिल्लीच्या सलामीवीर अभिषेक पोरेलने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४.२ षटकांत ६० धावा केल्या. जॅक फ्रेझरने शानदार फलंदाजी करत अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दोन्ही संघातील प्लेइंग -११

राजस्थान रॉयल्स :

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स:

जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT