dc vs lsg head to head record delhi capitals vs lucknow super giants match details amd2000 twitter
क्रीडा

DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

DC vs LSG, Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे आज होणारा सामना हा लखनऊसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. मात्र या संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेतून बाहेर पडलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या सामन्यात आपल्या बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आपला गेल्या सामन्यातील पराभव विसरुन दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील हेट टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ केवळ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान लखनऊ सुपरजायंट्सचा संघ आघाडीवर आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

कोण मारणार बाजी?

हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर दुसरीकडे लखनऊचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना लखनऊसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे लखनऊचा संघ विजयासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT