Dushmantha Chamira Catch Video 
Sports

IPL 2025:'कॅच ऑफ द मॅच'; दुष्मंथा चमीराचा Superman झेल पाहिला का? कॅच पाहून चाहते थक्क| Video Viral

Dushmantha Chamira Catch Video: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरनं दिल्लीसमोर २०४ धावांचे आव्हान दिलं. या सामन्यात दिल्लीचा खेळाडू दुष्मंथाने सुपर झेल घेतला. हा झेल कॅच ऑफ द मॅच ठरला.

Bharat Jadhav

मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नऊ बाद २०४ धावा केल्या. या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथ चामीराने असा शानदार झेल घेतला. त्याचा हा झेल इतका अद्भुत होता की तो आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल मानला जातोय.

शेवटच्या षटकात घेतला शानदार झेल

केकेआरच्या डावाच्या शेवटच्या षटकात हा शानदार झेल पाहायला मिळाला. हा झेल पाहून केवळ प्रेक्षकच नव्हे तर खेळाडूही आश्चर्यचकित झाले होते. १९.४ व्या षटकात मिचेल स्टार्कने अनुकुल रॉयला पॅडवर पूर्ण चेंडू टाकला. फलंदाजाने चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या दिशेने मारला. हा फटका सीमारेषा ओलांडून सहज षटकार जाईल असं वाटलं होतं. परंतु तेथे क्षेत्ररक्षणासाठी सुपरमॅन दुष्मंथा चमीरा होता.

त्याने सुपरमॅन प्रमाणे हवेत झेप घेत हा झेल पडला. दुष्मंथा चमीरा डावीकडून पळत आला आणि हवेत झेप घेत दोन्ही हातांनी एक शानदार झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि या हंगामातील हा सर्वोत्तम झेल मानला जातोय.

केकेआरची मजबूत धावसंख्या

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत २०४ धावांवर रोखले. ही धावसंख्या करताना केकेआरने ९ गडी गमावले. दिल्लीकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने तीन विकेट्स घेतल्या. प्रथम फंलदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर केकेआरने शानदार सुरुवात केली. वरच्या फळीतील फलंदाजांनी उत्तम खेळी केली. अंगकृष रघुवंशीने ३२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. तर रिंकू सिंहने २५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३६ धावा केल्या. या दोघांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर केकेआरनं २० ४ धावांचा डोंगर रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT