DC vs KKR IPL 2025: दिल्लीच्या स्टेडियमवर R-Rचा धमाका; दिल्ली समोर २०५ धावांचे आव्हान

IPL 2025, Delhi Capitals vs Kolkata: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ४८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आलेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होतोय.
DC vs KKR IPL 2025
IPL 2025, Delhi Capitals vs KolkataSaam Tv
Published On

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर केकेआरने धमाकेदार सुरुवात केली. रिंकू आणि रघुवंशीच्या शानदार खेळाच्या जोरावर केकेआरने दिल्लीसमोर २०५ धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर सुनील नरेन आणि गुरबाजने आक्रमक सुरूवात केली.दिल्ली गोलंदाजाने दोघांची पार्टनरशीप तोडली. केकेआरला ४८ धावांवर पहिला धक्का मिळाला.

पहिला धक्का गुरबाजच्या रुपाने मिळाला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सावरला. पण पुन्हा एकदा दिल्लीच्या गोलंदाजांनी छान शानदार खेळ करत ८५ धावांवर केकेआरला दुसरा धक्का सुनील नरेनच्या रुपाने मिळाला. नरेन २७ धावा करून बाद झाला. यानंतर ८ व्या षटकात कर्णधार रहाणेची विकेट पडली. अजिंक्य रहाणे २६ धावा करून तंबूत परतला. यानंतर मैदानात फलंदाजी उतरलेला व्यंकटेश अय्यर पु्न्हा एकदा अपयशी ठरला. तो १० व्या षटकात बाद झाला.

अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त ७ धावा करता आल्या. १० षटकांनंतर केकेआरचा स्कोअर ११७-४ होता. यानंतर रिंकू सिंग आणि अंगकृष रघुवंशी यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण १७ व्या षटकात अंगकृष रघुवंशी ४४ धावा करून बाद झाला.या दोघांमध्ये ६१ धावांची भागीदारी झाली होती.

अंगकृष रघुवंशी ४४ धावा बाद झाला. रघुवंशी बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात रिंकू सिंहदेखील ३६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलने एक छोटीशी वादळी खेळी खेळली, ज्याच्या आधारे केकेआरने दिल्लीला २०५ धावांचे लक्ष्य दिले.

दरम्यान या हंगामात, दिल्ली संघाने आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. तर दिल्लीचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता संघानेही ९ सामने खेळले आहेत, परंतु फक्त ३ सामन्यात विजय मिळालाय. तर पाइंट्स टेबलमध्ये ते ७ व्या क्रमांकावर आहेत.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com