DC Vs KKR IPL 2025 X
Sports

DC Vs KKR : कोलकाताला 'नारायण' पावला, अक्षर-विपराजची झुंज व्यर्थ; दिल्लीचा घरच्या स्टेडियमवर पराभव

DC Vs KKR IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२५ मध्ये आमनेसामने आले. या दोन संघांच्या लढतीत कोलकाताने दिल्लीवर मात केली आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाताने दिल्लीला १४ धावांनी पराभूत केले आहे. हा दिल्लीचा सलग दुसरा पराभव आहे. कोलकाताला प्लेऑफ्सच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. मध्यला ओव्हर्समध्ये फाफ आणि अक्षरने, तर शेवटच्या ओव्हर्समध्ये विपराज निगमने सामना दिल्लीकडे झुकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचे निवडले. दिल्लीच्या प्लेईंग ११ मध्ये काहीच बदल नव्हता, दुसऱ्या बाजूला कोलकाताने अनुकूल रॉयला प्लेईंग ११ मध्ये घेतले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनी २० ओव्हर्समध्ये २०४ धावा केल्या.

सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने फटाफट २६ धावा केल्या. सुनील नारायण २७ धावा करुन माघारी परतला. कॅप्टन अजिंक्य रहाणे २६ धावांवर बाद झाला. अंगकृष रघुवंशीने सर्वाधित ४४ धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंह (३६ धावा) आणि आंद्रे रसेल (१७ धावा) करत कोलकाताची धावसंख्या २०० पार नेली. दुसऱ्या बाजूला, दिल्लीकडून मिचेल स्टार्कने ३ विकेट्स; अक्षर पटेल-विपराज निगम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

२०५ धावांचे लक्ष्य गाठताना दिल्लीचे शिलेदार मैदानात उतरले. अभिषेक पोरेल ४ धावा करुन माघारी परतला. सलामीसाठी आलेल्या फाफने महत्त्वपूर्ण अर्धशतकीय खेळी केली. करुण नायरने १५ धावा केल्या. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स लवकर बाद झाले. जखमी अक्षर पटेल ४३ धावांवर कॅचआउट झाला. वरुण चक्रवर्तीच्या एकाच ओव्हरमध्ये आशुतोष शर्मा आणि मिचेल स्टार्क सलग बाद झाले. विपराज निगमने शेवटच्या ओव्हरपर्यंत दिल्लीला जिंकवण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही. सुनील नारायणने ३ विकेट्स घेत सामना केकेआरला जिंकवून दिला. वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी १-१-१ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT