DC VS GT Match Prediction Saam TV
Sports

DC VS GT Playing 11: विजयाचं खातं उघडण्यासाठी दिल्लीचा संघ उतरणार मैदानात! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11

DC VS GT Match Prediction: आयपीएल २०२३ स्पर्धेतील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

Ankush Dhavre

DC VS GT Match Prediction And Playing 11: आयपीएल २०२३ स्पर्धेतील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.(DC VS GT Playing 11)

हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगणार आहे. गुजरात टायटन्स संघ या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्नात असणार आहे.

तर पहिल्या सामन्यात पराभूत झालेला दिल्ली कॅपिटल्स संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (DC VS GT Match Prediction)

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्स (DC):

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

गुजरात टायटन्स (GT):

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ (Latest sports updates)

या खेळाडूंच्या कामगिरीवर असतील सर्वांच्या नजरा..

फलंदाज :

शुभमन गिल:

गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल कडून या सामन्यात देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी केली होती. चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे जर गुजरातला हा सामना जिंकायचा असेल तर, या सामन्यात देखील गिलला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

गोलंदाज:

राशिद खान:

अफगाणिस्थान संघातील फिरकी गोलंदाज राशिद खान देखील सध्या चांगली कामगिरी करतोय. गेल्या सामन्यात त्याने अवघ्या २६ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते. त्याने गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती.

पिच रिपोर्ट:

अरुण जेटली स्टेडियमचा विकेट स्लो असतो. मात्र आऊटफिल्ड फास्ट असल्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. मात्र हा सामना हाय स्कोरींग होणार यात काही शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Women's World Cup 2025: वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार, भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार, कधी होणार सामना?

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Shocking : बजरंग दलाच्या अध्यक्षाकडून 17 वर्षीय तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगरात खळबळ, काय आहे संपूर्ण प्रकरण?

सलमान खान दहशतवादी म्हणून घोषित, पाकिस्तान सरकारचा कारनामा; कारण काय? VIDEO

Mumbai Local Train: परतीच्या पावसानं बिघडवलं रेल्वेचं वेळापत्रक; मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

SCROLL FOR NEXT