David Warner
David Warner  Twitter
क्रीडा | IPL

David Warner Touched Bhuvneshwar Feet: दिल्लीचा कर्णधार भुवी समोर नतमस्तक! आधी धरले पाय नंतर मारली मिठी - VIDEO

Ankush Dhavre

SRH VS DC IPL 2023: हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ धावांनी विजय मिळवला. हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा या हंगामातील दुसरा विजय आहे.

या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. दरम्यान या विजयानंतर डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

हा सामना डेव्हिड वॉर्नरसाठी अतिशय खास होता. कारण त्याने गेली काही वर्ष ज्या संघाचे नेतृत्व केले. त्याच संघाविरुद्ध तो कर्णधार म्हणून खेळण्यासाठी उतरला होता. दरम्यान आपल्या जुन्या सहकाऱ्याला पाहून दिल्लीचा कर्णधार नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

डेव्हिड वॉर्नर सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतोय. मात्र २०२१ पर्यंत तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करत होता. त्यावेळी भुवनेश्वर कुमार हा सनरायझर्स संघाच्या उपकर्णधारपदाची भूमिका पार पाडायचा. (David Warner Touched Bhuvneshwar Feet

त्यामुळे हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यादरम्यान जेव्हा डेव्हीड वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला पाहिले त्यावेळी तो त्याच्याकडे धावत गेला आणि थेट भुवनेश्वर कुमारचे पाय धरले. त्यानंतर उठून त्याने भूवनेश्वर कुमारला मिठी मारली. ही मैत्री पाहून नेटकरी देखील भारावून गेले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)

दिल्लीचा जोरदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने ३४ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने देखील ३४ धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर ९ गडी बाद १४४ धावा केल्या. ता धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मयांक अगरवालने ४९ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३१ धावा केल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद २४ धावांची खेळी केली.

मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात दिल्ल्ली कॅपिटल्स संघाने ७ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT