david warner wicket saam tv
क्रीडा

Viral Cricket Video: बॉल आहे की बंदुकीची गोळी? हवेत फिरणाऱ्या चेंडूवर वॉर्नरची दांडी गुल; VIDEO पाहायलाच हवा..

David Warner Wicket Video: जोश टंगने असा काही चेंडू टाकला, जो पाहून फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरसह प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले.

Ankush Dhavre

Eng vs Aus Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये द अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. २८ जूनपासून सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली होती.

डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. मात्र गोलंदाजी करत असलेल्या जोश टंगने असा काही चेंडू टाकला, जो पाहून फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरसह प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले.

टंगचा चेंडू अन् डेव्हिड वॉर्नरची दांडी गुल..

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत होते. मात्र जोश टंगच्या एका चांगल्या चेंडूने डेव्हिड वॉर्नरचा गेम ओव्हर केला. तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन हे दोघेही संघाची धावसंख्या वेगाने पूढे घेऊन जात होते.

त्यावेळी कर्णधार बेन स्टोक्सने २५ वर्षीय जोश टंगला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. जोश टंगने आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत पाचव्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची दांडी गुल केली. (Latest sports updates)

तुम्ही जर हा चेंडू पाहीला तर, तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कारण राउंड द विकेटचा मारा करत असलेल्या जोश टंगने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. जो टप्पा पडताच आत आला आणि डेव्हिड वॉर्नरची दांडी उडवून गेला. फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड वॉर्नर या चेंडूवर चितपट झाला.

या चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ८८ चेंडूंचा सामना करत ७५.०० च्या स्ट्राईक रेटने ६६ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT