suryakumar yadav catch twitter
क्रीडा

Suryakumar Yadav Catch: डेव्हिड मिलर आऊट की नॉट आऊट? सूर्याच्या व्हायरल कॅचमागचं नेमकं सत्य काय? - VIDEO

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी नमवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या सामन्यातील टर्निंग पॉईंट म्हणजे सूर्यकुमार यादवचा तो कॅच.

डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र मोक्याच्या क्षणी सूर्याने बाऊंड्रीलाईनवर अविश्वसनिय कॅच घेतला आणि भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित करुन दिला. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात डेव्हिड मिलर नॉट आऊट असल्याचा दावा केला जात आहे. मात्र साम टिव्ही हा दावा खरा असल्याचा दावा करत नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. त्यावेळी हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. तर दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने फुल टॉस चेंडूवर लाँग ऑफच्या वरुन षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमार यादवने भन्नाट कॅच पकडला.

हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता मात्र त्याने चेंडू पकडला आणि मैदानाच्या आत फेकला आणि आतमध्ये येऊन कॅच पकडला. हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला. त्यावेळी तिसऱ्या अंपायरने वेगवेगळ्या अँगलने चेक केलं आणि फलंदाज बाद असल्याची घोषणा केली.

व्हायरल व्हिडिओ खोटा?

भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्याची संधी होती. मात्र एका कॅचमुळे दक्षिण आफ्रिकेचं हे स्पप्न भंग झालं आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू निराश झाले, रडले. मात्र दक्षिण आफ्रिकेचे फॅन्स संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचं म्हणणं आहे की, अंपायरने वेगवेगळ्या अँगलने पाहायला हवं होतं. तर काहींचं म्हणणं आहे की, सूर्यकुमार यादवचा पाय बाऊंड्रीलाईनला टच झाला होता.

आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूचा पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग बाऊंड्रीलाईनला टच झाला असेल, तर नियमानुसार बाऊंड्री दिली जाते. मात्र सूर्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा की खोटा? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भारतीय क्रिकेट फॅन्सने हा व्हिडिओ एडिट केला असल्याचं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT