dashrath jadhav saam tv news
Sports

Baramati : इतिहास घडवायला अंगात धमक आणि रक्तात वेड लागतं ! वाचा दशरथ जाधवांच्या जिद्दीची कहाणी

या स्पर्धेत अनेक भारतीयांचा समावेश होता परंतु दशरथ जाधव यांनी वेळेच्या तीन तास आधीच स्पर्धा पुर्ण केली.

मंगेश कचरे

London : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील सुपुत्र व पुण्याचे उद्योजक दशरथ दिनकर जाधव (Dashrath Dinkar Jadhav) यांनी लंडन (इंग्लंड) आणि एडीनबर्ग (स्कॉटलंड) या दोन 'कॅपिटल' शहरांमध्ये होणारी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी (930 मैल) सायकल स्पर्धा (cycling) विक्रमी वेळेत पुर्ण केली. विशेष म्हणजे जाधव यांनी वयाच्या 66 व्या वर्षी 125 तास 33 मिनिटांत या विक्रमी वेळेत पूर्ण करून इतिहास रचला आहे.

लंडन एडिनबर्ग लंडन ही (1540 किलो मीटर) अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा (128 तासात) पुर्ण करणे असा स्पर्धेचा नियम आहे. यामध्ये एकुण वीस कंट्रोल पॉईंट्स आणि दोन कंट्रोल पॉईंट्स मधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदती शिवाय तेही ठराविक वेळेतच पुर्ण करायचे असं देखील हाेतं. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक उत्तम पद्धतीने सायकलींगसाठी प्रयत्न करीत हाेता.

या स्पर्धेत स्पर्धकास शारीरिक तसेच मानसिक असे दोन्ही समतोल साधणं गरजेचे असतं. चढ आणि उतार अशा डोंगराळ रस्त्यावरून ऊन ,वारा, पाऊस झेलत अतिशय किचकट परिस्थितीत हि स्पर्धा दशरथ दिनकर जाधव यांनी पुर्ण केली. जाधव हे भारतातील एकमेव स्पर्धक हाेते. ज्यांनी हि स्पर्धा वयाच्या 66 व्या वर्षी पुर्ण करत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.

या स्पर्धेत यश मिळविलेल्या दशरथ जाधव यांनी केवळ महराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. त्यांचा आदर्श युवकांनी घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उमटू लागल्या आहेत.

या स्पर्धेत 120 भारतीयांनी विविध वयाेगटात भाग घेतला होता. त्यातील 47 भारतीय सायकल स्वारांनी स्पर्धा पूर्ण केली आहे. दरम्यान दशरथ जाधव यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅन किताब पटकाविला हाेता. त्यानंतर त्यांनी सलग सात वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT