Breaking : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर भामट्यांकडून गंडा!  SaamTvNews
Sports

Breaking : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर भामट्यांकडून गंडा!

विनोद कांबळी यांच्या खात्यातून १ लाख १४ हजार सायबर चोरट्यांनी चोरले!

सूरज सावंत

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू (cricket player) विनोद कांबळी (vinod kambli) यांची सायबर चोरट्याकडून फसवणूक (fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, सायबर भामट्यांपासून (Cyber Theif) सर्वसामान्यांसह सर्वच जण असुरक्षित असल्याचे स्पष्ट होतेय. विनोद कांबळीच्या खात्यातून १ लाख १४ हजार रुपये सायबर चोरट्यांनी चोरले आहेत.

हे देखील पाहा :

३ डिसेंबर रोजी कांबळी यांच्या मोबाइलवर एक निनावी फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण बँकेतून (Bank) बोलत असल्याचे सांगत. बँकेची KYC अपडेट नसल्याचे सांगितले. अपडेट न केल्यास व्यवहार ठप्प होण्याची भिती या चोरट्यांनी घातली. त्यावर कांबळी यांनी विश्वास ठेवल्याने कांबळी अलगद चोरट्यांच्या जाळ्यात अडकले.

चोरट्यांनी कांबळी यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील अँप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगून कांबळी यांच्या मोबाइलाचा एक्सेस मिळवला. त्यानंतर आरोपींनी टप्या टप्याने कांबळी यांच्या खात्यातून १ लाख १४ हजार चोरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळी यांनी वांद्रे पोलिसात (police) धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT