CSK Vs SRH Saam Digital
Sports

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Chennai Super Kings Vs SunRisers Hyderabad /IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. हैदराबदच्या संघाला १३४ धावात ऑलआऊट करून ७८ धावांंनी विजय मिळला.

Sandeep Gawade

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. हैदराबदच्या संघाला १३४ धावात ऑलआऊट करून ७८ धावांंनी विजय मिळला. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायवाडच्या तुफानी ९८ धावांंचा सिंहाचा वाटा राहिला. तुशार देशपांडेने ४ विकेट घेतल्या.

तिसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई सुपर किंग्जचा मागच्या दोन सामन्यात सलग पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान आज संघाने महत्त्वाचा आणि मोठा विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावरील चेपॉक स्टेडियमवर शेवटचा सामना गमावलेल्या रुतुराज गायकवाडच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासह चेन्नईने गुणतालिकेत हैदराबादलाही धक्का देत तिसरे स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 212 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये कर्णधार रुतुराजचे विशेष योगदान होते. त्याने 98 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

हैदराबाद संघ सलग दोन पराभवांमुळे चौथ्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्या शानदार खेळी पहायला मिळाली. तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. गायकवाड आणि मिशेलच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ १८.५ षटकांत १३४ धावांत गारद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT