आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय राजस्थानच्या फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. राजस्थान रॉयल्स संघाला २० षटकअखेर ५ गडी बाद १४१ धावा करता आल्या आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४२ धावांची गरज आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. कारण सलामीवीर फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले. सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या २४ धावांवर माघारी परतला. तर जोस बटलरला २१ धावा करता आल्या. कर्णधार संजू सॅमसनलाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. शेवटी ध्रुव जुरेलने २८ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १४१ धावांपर्यंत पोहचवली.
चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तुषार देशपांडे ४ षटक गोलंदाजी करत ३० धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले. तर सिमरनजीत सिंगने ३ गडी बाद केले.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट.
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन, केशव महाराज, नांद्रे बर्गर,
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक),, देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थेक्षाना
इम्पॅक्ट प्लेअर्स – अजिंक्य रहाणे, शांत सोळंकी, अजय मंडल, मुकेश चौधरी, समीर रिझवी,
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.