CSK vs KKR Playing 11 Prediction chennai super kings vs Kolkata knight riders playing 11 Prediction cricket news marathi amd2000 twitter
Sports

CSK vs KKR,Playing 11: चेन्नईच्या संघात ऋतुराज करणार मोठा बदल! CSK vs KKR सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

CSK vs KKR, Playing XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

CSK vs KKR Playing XI Prediction, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने चेपॉकवर खेळताना दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणारा सामना हाय व्हॉल्टेज होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार बदल?

या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यातून मोईन अलीला विश्रांती दिली जाऊ शकते. संघातील वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान अजुनही कमबॅक करु शकलेला नाही. या सामन्यासाठी मथीशा पाथिरानाला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर समीर रिजवी, मिचेल सँटनर आणि मोईन अलीपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शार्दुल ठाकुर आणि मुकेश चौधरीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. (Cricket news in marathi)

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, हा संघ सध्या शानदार कामगिरी करतोय. त्यामुळे या संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. या संघात सुयश शर्माचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११..

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, रविंद्र जडेजा, समीर रिजवी/ मिचेल सँटनर/ मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षणा

इम्पॅक्ट प्लेअर - मुकेश चौधरी

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११..

सुनील नरेन, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमनदिप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर - सुयश शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

Shanaya Kapoor : 'आंखों की गुस्ताखियां' चित्रपटात झळकणारी शनाया कपूर नक्की आहे कोण?

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT