csk vs gt saam tv
Sports

CSK Vs GT IPL Final 2023: फायनलपूर्वी CSK च्या चिंतेत वाढ! या कारणामुळे IPL ची ट्रॉफी निसटणार?

CSK Vs GT Head To Head Record: या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

CSK Vs GT IPL 2023 Match Updates: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे.

दोन्ही संघात एकापेक्षा एक धाकड खेळाडू आहेत, जे कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतात. दरम्यान या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी आकडेवारी.. (CSK VS GT Head To Head Record)

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी गुजरात टायटन्स संघाला पराभूत करणं सोपं मुळीच नसणार आहे. रेकॉर्ड बद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा रेकॉर्ड हवा तितका खास राहिला नाहीये.

हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने ३ वेळेस बाजी मारली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

हे दोन्ही संघ जेव्हा साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आमने सामने आले होते. त्या सामन्यात देखील गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवला होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. (Latest sports updates)

प्लेऑफमध्ये मिळवला होता विजय..

चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामातील अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. क्वालिफायरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर जोरदार विजय मिळवला होता.

त्यानंतर एलिमिनेटरच्या गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला ६२ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे चेन्नई गुजरात टायटन्स संघाला हलक्यात घेणं गुजरात टायटन्स संघाला महागात पडू शकतं.

अंतिम सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी..

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा हा आयपीएल स्पर्धेतील १० वा अंतिम सामना आहे. यापूर्वी या संघाने ९ वेळेस अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापैकी ४ वेळा जेतेपद पटकावण्यात यश आलं आहे. तर ५ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला मुंबईच्या ५ जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कीर्तनात गोंधळामुळे संगमनेरचे आजी माजी आमदार आमने सामने

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT