CSK vs DC IPL 2025 saam tv
Sports

CSK vs DC Pitch Report : चेन्नई की दिल्ली, कोण जिंकणार? खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? चकित करणारी आकडेवारी

CSK vs DC, IPL 2025 : दिल्ली विरुद्ध चेन्नई सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होत आहे. खेळपट्टीमुळं गोलंदाज फलंदाजांच्या ठिकऱ्या उडवणार की फलंदाज गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणार? असा प्रश्न दोन्ही संघांच्या फॅन्सच्या मनात घोळत आहे.

Nandkumar Joshi

आयपीएलमधील सर्वात तगडा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज, शनिवारी दुपारी सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ही लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या विजयी रथावर स्वार आहे, तर चेन्नई एक्स्प्रेस अद्याप ट्रॅकवर आली नाही. त्यामुळं हा सामना रोमहर्षक होणार आहे. पण त्याआधी खेळपट्टी अर्थात पिच कुणाला साथ देणार हा प्रश्न दोन्ही संघांसह त्यांच्या फॅन्सला सुद्धा सतावत आहे.

चेन्नईची खेळपट्टी कुणाला साथ देणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चेन्नईची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार की फलंदाज खोऱ्याने धावा ओढणार, असा प्रश्न आहे. आता याच मैदानात आयपीएलचे आतापर्यंत ८७ सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं ४८ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं ३७ वेळा विजय मिळवला आहे.

चेन्नईच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणारा संघच 'किंग' होणार आहे. पण चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यातील हा सामना दुपारी होणार असल्याने खेळपट्टी खेळ बिघडवू शकते. या मैदानात गोलंदाज फलंदाजांना गारद करू शकतात असा अंदाज आहे.

चेन्नईत पहिल्या डावात सरासरी १६४ धावा होतात. तर दुसऱ्या डावात सरासरी १५० धावा होतात. त्यामुळं धावांचा पाठलाग करणं या मैदानात कठीण होणार आहे. गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, ही खेळपट्टी त्यांना फायदेशीर ठरणार आहे. या मैदानात वेगवान गोलंदाज किंग ठरू शकतात. कारण येथे वेगवान गोलंदाज ६१ टक्क्यांपेक्षा जास्त विकेट्स घेतात. तसेच फिरकीपटूंना विकेट्स मिळवण्याची संधी ३९ टक्क्यांच्या जवळपास आहे.

दुपारच्या सुमारास सामना असल्यानं फलंदाजांना या खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. विकेट ड्राय असल्याने सुरुवातीला धावा करणे कठीण होऊ शकते. त्यानंतर फिरकीपटूही वरचढ ठरू शकतात.

कोण जिंकू शकतं?

चेन्नई सुपर किंग्ज हा बलाढ्य संघ मानला जातो. तुलनेने दिल्ली कॅपिटल्स कमकुवत वाटतो. असं असलं तरी यावर्षी सुरुवातीला युवा दिल्ली संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे. दिल्ली संघानं दोन्ही सामन्यांत विजय मिळवला असून, चार गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर चेन्नईला अद्याप बलाढ्य कामगिरी करता आली नाही.

तीन सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला. पॉइंट्स टेबलमध्ये हा संघ दोन गुणांसह आठव्या स्थानी आहे. रिपोर्टनुसार, चेन्नई घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळं त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. चेन्नईच्या विजयाची शक्यता ५३ टक्के आहे, तर दिल्लीच्या विजयाची शक्यता ४७ टक्के आहे. आता या दोघांमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT