ipl points table saam tv
क्रीडा

IPL 2023 Points Table: KKR विरुध्दच्या पराभवानंतर CSK बाहेर? तर या २ संघांची झाली चांदी; पाहा काय आहे प्लेऑफचं समीकरण

IPL Points Table After CSK vs KKR Match: घरच्याच मैदानावर चेन्नईला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

CSK VS KKR, IPL Playoffs: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत एकूण ६१ सामने खेळले गेले आहेत. मात्र एकही संघाने अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाहीये. कोलकाताविरुध्द झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाल्यानंतर इतर संघांना फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात घरच्याच मैदानावर चेन्नईला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा नीतीश राणाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा या हंगामातील ६ वा विजय ठरला. १२ पॉइंट्ससह कोलकाताचा संघ आता ७ व्या स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज बद्दल बोलायचं झालं तर, पराभूत होऊनही चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. उर्वरित एक सामना जिंकून चेन्नईचे १७ गुण होतील. त्यामुळे आता टॉप २ मध्ये पोहचण्याची शक्यता कमी झाली आहे.

चेन्नईच्या पराभवाने मुंबई इंडियन आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा फायदा झाला आहे. जर या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने जिंकले तर दोन्ही संघांना टॉप २ मध्ये जाण्याची संधी असणार आहे. असे झाल्यास त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोनदा संधी मिळेल.

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाने पंजाब किंग्ज संघाचं नुकसान झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज संघासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाचे देखील प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रयेकी ८-८ गुणांसह ९ व्या आणि १० व्या स्थानी आहे. (Latest sports updates)

घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव..

घरच्या मैदानावर हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा शेवटचा सामना होता. या महत्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनव्हेला हवी तशी कामगिरी करता आली नाही. दोघेही स्वस्तात माघारी परतले. शेवटी शिवम दुबेने अप्रतिम खेळी करत ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर चेन्नईला १४४ धावा करता आल्या.

या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रिंकू सिंग आणि नीतीश राणाने तुफान फटकेबाजी केली. दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT