CSK Post MS Dhoni Special Video: आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना काही दिवसांपूर्वी पार पडला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पाचवे जेतेपद पटकावले होते.
हा विजय मिळवल्यानंतर एमएस धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र धोनीने स्वतः या चर्चाना पूर्णविराम दिला आणि आगामी हंगामात देखील खेळणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र आता चेन्नई सुपर किंग्ज संघाने केलेल्या एक पोस्टमुळे पुन्हा एकदा एमएस धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा ३३ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
या व्हिडिओमध्ये त्यांनी या हंगामातील एमएस धोनीचे टिपलेले काही खास क्षण दाखवले आहेत. हा व्हिडिओ समोर येताच पुन्हा एकदा एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. ज्याप्रकारे त्याने निवृत्ती जाहीर केली होती, तसा कोणी विचारही केला नव्हता.
आता लवकरच तो आयपीएलमधून देखील निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहेत. आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर एमएस धोनीने स्पष्ट केलं होतं की, त्याच्याकडे अजूनही ८ ते ९ महिने आहेत. (Latest sports updates)
दुखापतग्रस्त असूनही संघाला जिंकून दिली ट्रॉफी..
एमएस धोनीने संघाला पाचवी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. संपूर्ण हंगामात तो दुखापतग्रस्त होता,तरीदेखील शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने मैदान सोडलं नाही. या हंगामात तो फलंदाजीला देखील मागच्या क्रमांकावर आला होता.
मात्र यष्टीमागे त्याची दमदार कामगिरी पाहायला मिळाली.हे हंगाम झाल्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.