csk fans gave new nickname to ravindra jadeja afer ms dhoni and suresh raina amd2000 twitter
Sports

Ravindra Jadeja Nickname: धोनी, रैनानंतर CSK च्या फॅन्सने जडेजासाठी सुचवलं हटके नाव

Ravindra Jadeja Nickname Given By CSK Fans: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजाने शानदार खेळ केला. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात १८ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Nickname News:

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजाने शानदार खेळ केला. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात १८ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर क्षेत्ररक्षण करताना ३ झेल टिपले. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत १०० झेल टिपण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला. या सामन्यातील कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान विजयानंतर त्याला आणखी एक खास गिफ्ट मिळालं आहे.

चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात जडेजा जेव्हा सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला हर्षा भोगले यांनी विचारलं की, ' चेन्नईच्या फॅन्सकडून धोनीला थाला म्हटलं जातं. सुरेश रैनाला चिन्ना थाला म्हटलं जातं. तसं तुला काय म्हणतात? त्यावेळी जडेजा म्हणाला की, मला अजूनही चेन्नईच्या फॅन्सकडून कुठलीही उपाधी देण्यात आलेली नाही. (Cricket news in marathi)

हर्षा भोगले पुढे म्हणाले की, ' 'मला खात्री आहे की, चेन्नईचे फॅन्स त्याला उपाधी देतील.' आता चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात अधिकृतरीत्या जडेजाला क्रिकेट थालापती ही उपाधी देण्यात आली आहे. रविंद्र जडेजाने या सामन्यात १५ व्या वेळेस सामनावीर पुरस्कार जिंकला. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक वेळेस पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत त्याने एमएस धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजयरथ थांबवला. गेले सलग ३ सामने जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या संघाने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT