EPFO Update: ३ वर्षे PF खात्यात पैसे जमा नाहीत? तरीही मिळणार व्याज; EPFO चा मोठा नियम

PF Account Inactive Rules: तीन वर्षांपासून पीएफ खात्यात पैसे जमा झाले नसले तरी व्याज मिळू शकतं. EPFO चे निष्क्रिय खात्याचे नियम जाणून घ्या.
PF account
PF accountmeta ai
Published On: 

नोकरी सोडल्यांनंतर किंवा दुसऱ्या कंपनीत रुजू झाल्यानंतर बरेचजण आपले जुने पीएफ खातं तपासत नाहीत. त्यामुळे तीन वर्षांपासून खात्यात पैसे जमा झाले नसले, तर आता व्याज मिळणं बंद झालं असं अनेकांना वाटतं. पण हा समज चुकीचा आहे. EPFO च्या नियमांनुसार, फक्त तीन वर्षे पैसे जमा झाले नाहीत म्हणून पीएफ खातं बंद होत नाही किंवा त्यावरचं व्याज थांबत नाही. त्यामुळे जुन्या पीएफ खात्यात पैसे असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

PF खात्यावर व्याज कधीपर्यंत मिळतं?

कर्मचाऱ्याने वयाची ५५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली, तर त्याच्या PF खात्यातील जमा रकमेवर नियमानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत व्याज मिळू शकतं. पण खातं निष्क्रिय (Inoperative) झाल्यानंतर त्यावर व्याज जमा केलं जात नाही.

PF account
महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; खात्यात ४ दिवसात ₹३००० येणार

PF खाते कधी निष्क्रिय होते?

EPFO च्या नियमांनुसार, खालील परिस्थितींमध्ये PF खातं निष्क्रिय होऊ शकतं.

वयाची ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती - निवृत्तीनंतर ३६ महिन्यांत PF रक्कम काढली नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर - निर्धारित कालावधीत PF रक्कम काढली नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

खातेदाराचा मृत्यू - नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांनी ३६ महिन्यांत दावा केला नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

पेमेंट अयशस्वी होणे - चुकीच्या बँक तपशीलांमुळे पैसे परत आल्यास आणि ३६ महिन्यांत दावा न केल्यास खाते निष्क्रिय होऊ शकते.

PF account
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट

PF चे पैसे कसे काढायचे किंवा ट्रान्सफर करायचे?

PF खात्यातील पैसे काढण्यासाठी किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी EPFO च्या Member e-Sewa पोर्टलचा वापर करता येतो.

Form 19 - पात्रतेनुसार PF ची अंतिम रक्कम काढण्यासाठी.

Form 13 - नवीन कंपनीतील PF खात्यात जुनी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी.

Form 20 - खातेदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांकडून दावा करण्यासाठी.

आधार आणि बँक खाते अपडेट ठेवा

PF चे पैसे काढण्यापूर्वी आधार, बँक खाते आणि KYC तपशील अपडेट व व्हेरिफाय असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी UAN आणि पासवर्ड वापरून EPFO पोर्टलवर लॉगिन करावे. तेथे PF बॅलन्स तपासून पैसे काढायचे की नवीन खात्यात ट्रान्सफर करायचे, याचा निर्णय घेता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.