CSK fan shameful act saam tv
Sports

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर CSK चाहत्याचं लज्जास्पद कृत्य; विदेशी अंपायरने Video पोस्ट केल्याने उडाली खळबळ

Tribute Pahalgam Attack Victims: मंगळवारी काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. याच दिवशी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या चाहत्याने एक संतापजनक कृत्य केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

22 एप्रिलचा दिवस सर्व भारतीयांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. या दिवशी दहशतवाद्यांनी काश्मिरमधील पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये २८ जणांना मृत्यू झाला. दरम्यान सध्या आयपीएल सुरु असून याच दिवशी मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईच्या एका चाहत्याने असं कृत्य केलंय की ज्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार होतोय.

दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. सोशल मीडियावरून किंवा रस्त्यांवर कँडल मार्च काढून नागरिक मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली देत होते. अशातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने देखील मुंबई विरूद्ध हैदराबाद सामन्यापूर्वी एक महत्त्वाची घोषणा केली होती. सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांना ६० सेकंद उभं राहून मौन पाळण्यास सांगितलं होतं.

यामध्ये दिग्गज अंपायर रिचर्ड केटलब्रो यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये मुंबई विरूद्ध सनरायझर्स यांच्यातील सामन्यापूर्वी संपूर्ण स्टेडियममध्ये मौन पाळलेलं असताना एक चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातलेला चाहता मात्र स्वतःच्याच मस्तीमध्ये दिसला. सामना पाहायला आलेले चाहते उभं राहून श्रद्धांजली वाहत असताना तो एकटा मात्र खुर्चीवर बसून होता.

मला उत्तर जाणून घ्यायचंय- केटलब्रो

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममधील हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर केटलब्रो यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, पहलगाम हल्ल्याच्या विरोधात सर्वजण एकजुटीने उभे आहेत, मात्र एक चाहता असं करत नाहीये. नेहमीचं CSK चे चाहते असं का करतात? मला याचं उत्तर जाणून घ्यायचंच आहे.

क्रिकेटप्रेमीही संतापले

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोछी फॅनबेस असलेल्या टीमपैकी एक आहे. व्हायरल होत असलेल्या या CSK च्या चाहत्यांवर क्रिकेट प्रेमीही संतापले आहे. एका चाहत्याने असं म्हटलंय की, यावेळी सर्वजण खेळभावना नाही तर देशभक्तीसाठी एकत्र आले होते. त्यामुळे त्यानेही सर्वांप्रमाणे श्रद्धांजली अर्पण करायला पाहिजे होती.

सामन्यात मुंबईचा विजय

मुंबई विरूद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये SRH च्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४३ रन्स केले होते. यानंतर मुंबईने १६ ओव्हर्समध्ये ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या पराभवामुळे हैदराबादच्या टीमला प्लेऑफचा रस्ता काहीसा कठीण मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT