कोस्टा रिकाच्या फुटबॉलपटूसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूने नदीत उडी मारली अन् होत्याचं नव्हतं झालं.
नदीत उडी मारताच जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझवर मगरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खेळाडू चुचो या नावाने देखील ओळखला जातो.
जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझ हा आपल्या मित्र मंडळी आणि भावंडांसह कनास नदीच्या पुलावर गेला होता. त्यावेळी जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझला मित्रांनी आणि भावंडांनी उडी न मारण्याचा सल्ला दिला होता.
मात्र त्याने कोणाचंच ऐकलं नाही.त्याने पुलावरून उडी मारली. उडी मारताच मगरीने त्याच्यावर हल्ला चढवला.
मगरीने पकडल्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि गावकऱ्यांनी त्याला मगरीपासून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मगर काही त्याला सोडायला तयार नव्हती. ती जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझला दूर घेउन जात असताना गावकऱ्यांनी तिच्यावर गोळी झाडली.
कोस्टा रिकामध्ये प्राणी मात्रांना मारणं गुन्हा आहे. ज्यात मगरीचा देखील समावेश आहे. आता गावकऱ्यांवर देखील कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (latest sports update)
कोण आहे जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझ?
अल्बर्टो लोपेझ ओर्टिझ हा पोर्टिव्हो रिओ कनास संघाचे प्रतिनिधित्व करायचा. रिओ कनासने अल्बर्टो लोपेझ ओर्टिझचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी डेली मेलला दिलेल्या वृत्तानुसार,अल्बर्टो लोपेझ ओर्टिझचा मृतदेह मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले मात्र मृतदेह मिळवता आले नव्हते. त्यानंतर मगरीला गोळी मारण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.