सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधानमंडळात गौरव करण्यात आला.या विशेष प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी गवई यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी भूषण गवई यांच्या प्रवासाचे भावपूर्ण शब्दांत वर्णन केले. मुख्यमंत्री म्हणाले, हा सत्कार केवळ महाराष्ट्र विधीमंडळाचा नाही, तर राज्यातील तब्बल १३ कोटी जनतेचा सन्मान आहे.
सत्कारासंदर्भात गवई यांना विचारणा झाली असता, त्यांनी केवळ सत्कार नको, तर संविधान विषयक मार्गदर्शनाचे सत्रही आयोजित करावे, अशी विनंती केली. यावरून त्यांच्या साधेपणाचे दर्शन होते.दादासाहेब गवई हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते आणि तोच गुण भूषण गवई यांनीही आत्मसात केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले, सरन्यायाधीश झाल्यानंतरही भूषण गवई यांनी स्वतःला कोशात बंद केलं नाही. सरकारी वकील असताना नागपूरमधील झोपडपट्ट्यांवरील कारवाईचा मुद्दा उद्भवला होता. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन नागरिकांच्या हिताचा मार्ग शोधला.
मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असतानाही त्यांनी अनेकदा फक्त कायदाच नव्हे, तर व्यापक जनहित लक्षात घेऊन ठोस निर्णय घेतले. समाजाच्या हितासाठी मार्गदर्शक ठरणारे हे कार्य आज प्रेरणादायी ठरत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.