Maharashtra Monsoon Tourism : धबधबा, धरणे, गडकिल्ल्यावर पर्यटनाला जाताय? थांबा...! सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

Monsoon Tourism : कुंडमाळा पुलाच्या दुर्घटनानंतर, जिल्हा प्रशासनाने धबधबे, धरणे, गडकिल्ले या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येला मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षिततेसाठी ‘पर्यटक मित्र’ नेमले जाणार असून प्रवेशासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
Maharashtra Monsoon Tourism
Maharashtra Monsoon Tourism Saam Tv
Published On

पावसाळ्यात निसर्ग अधिक खुलून दिसतो. अशा निसर्गरम्य वातावरणात भटकंती करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटन करतात. प्रामुख्याने धबधबा, धरणे, गडकिल्ले अशा ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. अशा गर्दीत कोणत्याही पर्यटकाला इजा होऊ नये म्हणून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वन विभाग आणि पर्यटनस्थळावरील स्थानिक अधिकारी संबंधित पर्यटन ठिकाणची प्रवेशसंख्या निश्चित करणार आहेत. तशी सूचना जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला केली आहे.

पुण्यातील कुंडमेळा पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पर्यटन धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सुक्षेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डड्डी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली या बैठकीत वन विभागाचे उप वनसंरक्षक आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.

Maharashtra Monsoon Tourism
Kundmala Bridge Collapsed: कुंडमळा पूल कोसळतानाचा थरकाप उडवणारा फोटो समोर, दुर्घटनेत चौघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

धबधबा, धरणे, गडकिल्ले अशा ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी एका वेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार प्रवेशसंख्या निश्चित करण्याची सूचना वन विभागाला देण्यात आली आहे. त्यानुसार विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांची स्थिती पाहून तेथील वन विभागाचे अधिकारी तेथील प्रवेश मर्यादा निश्चित करणार आहेत. असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Monsoon Tourism
Pune Picnic Spot : वन डे ट्रिप... पुण्यापासून हाकेच्या अंतरावर अनुभवाल मनाला भुरळ घालणारे सौंदर्य

पर्यटन स्थळावर जाण्यासाठी ठराविक स्वरूपाचे प्रवेश शुल्कही निश्चित केले जाणार आहे. पर्यटकांनी किती अंतरापर्यंत जावे त्याचे क्षेत्र निश्चित केले जाणार आहे. पर्यटकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा तयार केली जाईल. बॅरिकेट्स लावण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य म्हणून वन विभागाच्या सुरक्षा रक्षकांचा उपयोग केला जाणार आहे. मात्र, वन विभागाकडे सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याने काही स्थानिक नागरिकांची पर्यटक मित्र म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या पर्यटक मित्रांना पर्यटन शुल्कातून जमा केलेल्या निधीतून मानधन दिले जाईल असे डड्डी यांनी सांगितले.

Maharashtra Monsoon Tourism
Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

कुंडमाळा पुलावर नेमकं काय घडलं ?

पुण्यातील कुंडमाळा पुलावर एकाच वेळी भरपूर पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे पूल पूर्णपणे इंद्रायणी नदीमध्ये झुकला आणि पुलावर असणारे पर्यटक नदीमध्ये पडले. पूल कोसळल्यानंतर पर्यटक वाहत्या नदीतून वाहून गेल्याची घटना घडली होती. पुलाला धरून उभे असलेले नागरिक वाचले पण काही पर्यटक वाहून गेले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाला काही जणांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com