Rishabh Pant Car Accident SAAM TV
क्रीडा

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

क्रिकेटपटू रिषभ पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.

Satish Daud

Rishabh Pant Accident : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातात रिषभ पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, ऋषभ पंतची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला रेफर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंत हा दिल्लीहून उत्तराखंड येथील आपल्या घरी जात असताना, रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, कार तीन ते चार वेळा उलटली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत पंत हा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली.

अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खूप दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यालाही बराच मार लागला आहे. अपघातानंतर पंतला तातडीने दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे पंतवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (Indian Cricket Team)

पंतच्या अपघाताची बातमी कळताच, क्रिडाप्रेमींच्या काळाजाचा ठोका चुकला आहे. बांग्लादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत पंतने चांगली कामगिरी केली होती. मात्र, असं असूनही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात त्याला वगळण्यात आलं आहे. ऋषभ पंत एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेचा दोन्हीचा भाग नाही. हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT