Cricketer Death x
Sports

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Nicholas Saldanha Passes Away : माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. एमसीएने साल्दान्हा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Yash Shirke

  • महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटूचे निधन

  • वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

  • क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त

Cricketer : क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे पुण्यात वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला आहे. देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्रासाठी निकोलस साल्दान्हा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

निकोलस साल्दान्हा हे उजव्या हाताचे फलंदाज होते. फलंदाजीसह ते फिरकी गोलंदाजी देखील करत. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. एकूण कारकीर्दीमध्ये निकोलस साल्दान्हा यांनी ५७ प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने २,०६६ धावा केल्या. २२.४८ च्या प्रभावी सरासरीने १३८ बळी घेतले होते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने निकोलस साल्दान्हा यांना श्रद्धांजली वाहिली. एमसीएने साल्दान्हा यांना आमच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून संबोधले. 'निकोलस साल्दान्हा हे एक समर्पित आणि प्रतिभावान क्रिकेटपटू होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मैदानावरील कामगिरीने आणि खेळाप्रती असलेल्या वचनबद्धतेने त्यांनी सर्वांवर ठसा उमटवला,' असे एमसीएने अधिकृत निवेदनात म्हटले.

निकोलस साल्दान्हा यांचा जन्म २३ जून १९४२ रोजी नाशिकमध्ये झाला. ते संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाकडून क्रिकेट खेळले नाही. त्यांना भारताकडून खेळायची संधी मिळाली नाही, पण त्यांनी महाराष्ट्राच्या संघाला एकट्याने अनेक सामने जिंकवून दिले. साल्दान्हा हे त्यांच्या लेग ब्रेक गुगलीसाठी प्रसिद्ध होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT