Cricket Coach Attacked updat Saam tv
Sports

डोक्याला २० टाके, खांदा फ्रॅक्चर; ३ क्रिकेटपटूंचा प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला, क्रीडाविश्वात खळबळ

Cricket Coach Attacked update : तीन क्रिकेटपटूंनी प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पाँडेचेरीत कोचवर तीन खेळाडूंकडून जीवघेणा हल्ला

खेळाडूंकडून कोचच्या डोक्याला मारहाण

डोक्याला 20 टाके पडले आणि खांदा फ्रॅक्चर

या प्रकरणी पोलिसांत FIR नोंदवण्यात आला आहे

Cricket Coach Attacked : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी हाती आली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीशी संबंधित वृत्त समोर आलं आहे. पाँडेचेरीशीमध्ये अंडर-१९ टीमचा कोचवर सोमवारी तीन स्थानिक क्रिकेटपटूंनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात कोचच्या डोक्याला २० टाके पडले आहेत. तर खांदा फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या अंडर १९ हेड कोच एस वेंकटरमन यांच्यावर तीन खेळाडूंनी रागाच्या भरात तिघांनी हल्ला केला. मीडिया रिपोर्टनुसार, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या संघात स्थान न मिळाल्याने तीन खेळाडू भडकले. माजी CAP सचिव वेंकटरमन यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्या खांद्याला देखील मोठी दुखापत झालीये.

तिन्ही खेळाडूंनी सोमवारी सकाळी ११ वाजता कोचवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी सेदरापेट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सब-इन्स्पेक्टर आर राजेश यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या कोचची प्रकृती सध्या स्थिर आहे.

एस वेंकटरमन यांनी हल्ला करणाऱ्या तीन खेळाडूंच्या नावाची तक्रार पोलीस स्टेशनला दिली. यात वरिष्ठ खेळाडू कार्तिकेयन जयासुंदरम, फर्स्ट क्लास श्रेणीतील ए अरविंदाराज आणि एस संतोष कुमारन यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीदासन पाँडेचेरी क्रिकेटर्स फोरमचे सचिव जी चंद्रन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. टी२०- संघात निवड न झाल्याने तिघांनी हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

तिघांनी कोचवर हत्या करण्याच्या दृष्टीनेच हल्ला केल्याचा आरोप आहे. तिन्ही खेळाडूंनी चंद्नन यांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप आहे. तुला जीवे मारून टाकू, अशीही धमकी तिघांनी दिली. परंतु भारतीदासन पुडुचेरी क्रिकेटर्स फोरमने कोचचे आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT