Flood : पुराचा हाहाकार! 950 हून अधिक लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता, कोणत्या शहरावर देव कोपला?

Indonesia flood : इंडोनेशियामध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पुरात 950 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची हाती आली आहे.
indonesia news
indonesia flood Saam tv
Published On
Summary

इंडोनेशियातून पुराचे धडकी भरवणारे फोटो व्हायरल

पुरात ९५० हून अधिक लोकांचा मृत्यू

झाडांच्या फांद्या उचलण्यासाठी घेताहेत हत्तीची मदत

इंडोनेशियाच्या अचे प्रांतातून धडकी भरवणारी दृश्य समोर आले आहेत. जंगलातील झाडे तोडल्यानंतर आलेल्या पुराने शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पाहायला मिळत आहेत. या झाडांच्या फांद्या उचलण्यासाठी हत्तींची मदत घेतली जात आहे.

इंडोनेशियाच्या अचे प्रांतातील पीडिए जया जिल्ह्यातील मेरेउदू शहराला पूराचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमात्रा बेटावर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुरामुळे आतापर्यंत ९५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेच्या मतानुसार अचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा प्रांतात अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे ९५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियामधील एकूण पुरात २७४ लोक बेपत्ता झाले आहेत. तर बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पाण्यामुळे जिल्ह्यातील हजारो गावे आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे पीडीए जया, मध्य अचे, बेनेर मेरिया आणि अचे प्रांतातील जिल्ह्यात दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेले आहेत. तर वीज आणि पाणीपुरवठा देखील खंडीत झाला आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, अंदाजे ३२ लाख लोकांना फटका बसला आहे. या पुरातून आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

पूरग्रस्त भागात अन्न, निवारा आणि औषधांची तीव्र टंचाई देखील झाल्याची माहिती हाती आली आहे. अचे शहरात पिण्याचे पाणी आणि पंपावर इंधनासाठी लांब रांगा लागत आहेत. बाजाराता गरजेच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुरामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना डॉक्टरही अपुरे पडत आहेत.

indonesia news
CSMT स्टेशनवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार; कधीपासून होणार कामाला सुरुवात?

बाजारात तांदूळ, भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तिप्पट झाल्या आहेत. सात दिवसांत पुरवठा साखळी पूर्ववत केली नाही, तर दुष्काळ पडण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे सरकारने मदत म्हणून ३४,००० टन तांदूळ आणि ६८ लाख लिटर स्वयंपाकासाठी तेल पाठवलं आहे. परंतु गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अनेक भागात इंटरनेट नेटवर्क देखील बंद झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com