Chamika Karunaratne Saam TV
Sports

VIDEO : श्रीलंकेचा ऑलराऊंडर गंभीर जखमी; कॅच पकताना तोंडावर आपटला बॉल, चार दात पडले

चमिका करुणारत्नेच्या जबड्यालाही गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रविण वाकचौरे

Chamika Karunaratne Injured : लंका प्रीमियर लीग (LPL) 2022 सध्या श्रीलंकेत खेळली जात आहे. या स्पर्धेत एका सामन्यात मोठा अपघात झाला असून एक स्टार खेळाडू गंभीर जखमी झाला आहे. श्रीलंकेचा ऑलराऊंडर चमिका करुणारत्ने एक कॅच पकडताना गंभीर जखमी झाला आहे.

कॅच पकडताना चेंडू तोंडाला लागल्यामुळे चमिका करुणारत्ने रक्तबंबाळ झालेला दिसला. यात त्याचे तीन-चार दातही तुटल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या जबड्यालाही गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Cricket News)

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, करुणारत्नेची प्रकृती ठीक असून कोणताही धोका नाही. करुणारत्ने कॅंडी फाल्कन्सकडून खेळत असून लीगच्या चौथ्या सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. कार्लोस ब्रॅथवेटचा कॅच पकण्याच्या प्रयत्नात करुणारत्ने जखमी झाला. (Latest News Update)

कॅच पकडताना चेंडूचा अचूक अंदाज न आल्याने करुणारत्नेच्या चेहऱ्यावर चेंडू आपटला आणि त्याचे चार दात तुटले. करुणारत्नेने झेल पकडला, पण लगेचच त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. करुणारत्नेची प्रकृती ठीक असून तो धोक्याबाहेर असल्याचे टीम मॅनेजमेंटने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

करुणारत्नेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

करुणारत्नेने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने श्रीलंकेसाठी आतापर्यंत एक कसोटी, 18 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

कसोटीत 22 धावा करण्यासोबतच त्याने एक विकेटही घेतली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 376 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावे एक अर्धशतकही आहे.

T20 मध्ये करुणारत्नेच्या बॅटमधून 257 धावा निघाल्या आहेत, ज्यामध्ये 31 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT