Hardik Pandya vs Virat Kohli Saam TV
क्रीडा

Sport News : कर्णधार झाला अन् रंग बदलला, हार्दिकने केला विराटचा अपमान? VIDEO व्हायरल

Hardik Pandya vs Virat Kohli : हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून क्रिडाप्रेमी संताप व्यक्त करत आहे.

Satish Daud

IND vs AUS 1st ODI Match Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)  यांच्यात वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा ५ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माची अनुपस्थिती असल्याने टीम इंडियाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती. (Latest sports updates)

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारपदाची धुरा चांगलीच सांभाळली. त्याने अचूक निर्णय घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बचावली. दरम्यान, सामन्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून क्रिडाप्रेमी संताप व्यक्त करत आहे.

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत विराट कोहली हा हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) काहीतरी सल्ला देत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, विराट बोलत असताना हार्दिक पांड्या त्याच्याकडे लक्षच देत नाहीये. ही गोष्ट घडली ती सामन्याच्या २१ व्या षटकात. यावेळी भारताचा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता.

त्यावेळी हार्दिक पंड्या हा फिल्डिंगबाबत एक निर्णय घेत असल्याचे दिसत होते. हार्दिकच्या जवळ विराट कोहली होता आणि हार्दिकला सल्ला देत असल्याचे पाहायला मिळाले. पण हार्दिकने विराटकडे पाहिलेच नाही. हार्दिक यावेळी आपल्याच निर्णयावर कायम राहीला. त्याने कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूचा अपमान केल्याची भावना काही क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.

टीम इंडियाचा कर्णधार कुणीही असला तरी संघातील अनुभवी खेळाडू त्याला मैदानावर मोलाचे सल्ले देत असतात. अगदी महेंद्रसिंग धोनीने सुद्धा अनेकवेळी संघातील वरिष्ठ खेळाडूंचे सल्ले घेतले होते. पण हार्दिक पांड्या कॅप्टन झाला अन् त्याचा रंग बदलला, अशी टीका टिप्पणी क्रिडाप्रेमी या व्हिडीओनंतर करत आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ १८८ धावांवर गारद झाला होता. टीम इंडियानं हे आव्हान ३९.५ षटकांत गाठलं.

१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. अवघ्या ३९ धावांवर भारताने चार विकेट गमावल्या होत्या. मात्र, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी सावध खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT