India Women vs South Africa Women Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज तिसरा वनडे सामना होणार आहे. पण भारत आणि क्रीडा विश्वाच्या नजरा या भारतीय महिला संघाकडे असतील. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये वने विश्वचषकासाठी आज सामना होणार आहे. भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यास पैशांचा पाऊस पडणार आहे. स्वप्नातही पाहिली नसेल इतकी रक्कम प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला येणार आहे.
नवी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जातेय. उपांत्य फेरती बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभव करत भारतीय संघाने विश्वचषक विजयाकडे पाऊल टाकलेय. भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले तर हरमनप्रीत आण ब्रिगेडचे नाव भारती क्रिकेटच्या इहिसात नोंदवले जाणार आहे. जर भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले तर आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम त्यांना बीसीसीआयकडून बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास बीसीसीआयकडून पैशांचा पाऊस पडणार आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने नवी मुंबईत ट्रॉफी जिंकल्यास पुरूष संघाएवढे रोख बक्षीस देण्याची बीसीसीआयची योजना आखली. दक्षिण आफ्रिकेला हरवत महिला संघाने पहिल्या विश्वचषकावर नाव कोरल्यास BCCI कडून १२५ कोटी रूपयांचे बक्षीस देण्याची तयारी करण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यावेळी बीसीसीआयने क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफसह संपूर्ण संघासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस दिले होते. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय महिला संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यास बीसीसीआयकडून १२५ कोटींच्या बोनसची घोषणा करण्यात येणार आहे.
विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या विजेत्याला संघावरही आयसीसीकडून पैशांचा पाऊस पडणार आहे. बक्षीस रकमेत जवळजवळ ३ पट वाढ करण्यात आलेली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०२२ च्या विश्वचषकात विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि उपविजेत्या इंग्लंडला अनुक्रमे ११ कोटी आणि ५ कोटी मिळाले होते. पण यावेळी दोन्ही संघांना या रकमेत जवळजवळ २३९ टक्के वाढ करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.