Lata Mangeshkar Saam TV
Sports

IND vs WI: भारतीय संघ आजचा सामना काळ्या पट्टया बांधून खेळणार; क्रिकेटप्रेमी लता दीदींना आदरांजली

आज (रविवार) लता मंगेशकर यांच्या निधनानं देशात शाेककळा पसरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : भारतीय संघ आज वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI Series) हाेणा-या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काळ्या पट्टी बांधून खेळणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. क्रिकेटच्या चाहत्या सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांना अदारांजली म्हणून राेहित शर्मा (rohit sharma) याच्या नेतृत्वाखाली संघ (indian team) आज काळ्या पट्टी बांधून खेळतील असे शुक्ला यांनी नमूद केले. (In honour of Lata Mangeshkar indian players will wear a black band in the match between India & West Indies at the Narendra Modi Stadium in Ahmedabad today)

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडू हातावर काळ्या पट्टी बांधतील. राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकेल असे शुक्ला यांनी ANI ला सांगितले. (India Play their 1000th ODI today)

लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजही दोन दिवस अर्ध्यावर फडकवून आदरांजली वाहिली जाणार आहे. मंगेशकर यांच्या पश्चात आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर अशी चार लहान भावंडे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT