Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनाने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

आज संपुर्ण देशासह परदेशात लता दीदींच्या चाहत्यांमध्ये शाेककळा पसरली आहे.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSaam Tv
Published On

दिल्ली : आज (रविवार) सकाळी सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar passes away) यांचे निधन झाले. लता दीदींच्या निधनाची बातमी समजताच काेट्यावधी नागरिकांची आपलं घरातलं माणूस गेल्या सारखी स्थिती झाली. लता दीदी यांच्या स्मरणार्थ देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या सन्मानार्थ दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार (फडकणार) आहे. (two days mourn in india memory of legend singer lata mangeshkar)

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar : लता दीदींना एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता : नरेंद्र माेदी

लता मंगेशकर यांच्या निधनाने सा-या देशात शाेककळा पसरली आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले हाेते. हा सन्मान मिळवणाऱ्या एमएस सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर त्या दुसऱ्या गायिका ठरल्या आहेत.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar passes away: लता दीदींच्या अडचणीत पाठीशी राहायचे बाळासाहेब ठाकरे

लताजींचे निधन माझ्यासाठी हृदयद्रावक आहे. भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील अशी शब्दांत राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दिग्गज पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील आणि परदेशातील प्रत्येक घराघरातील व्यक्तींसाठी दुःखद बातमी आहे अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लता मंगेशकर यांनी अदारांजली वाहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com