Corey Anderson Catch in MLC 2024 @MLCricket/X
Sports

Viral Video : अद्भूत, अविश्वसनीय...; हवेत झेपावत कोरे अँडरसननं घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ बघाल तर हैराण व्हाल!

Corey Anderson Catch in MLC 2024 : अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटचा थरार सुरू आहे. त्याचा अनुभव २७ जुलैच्या सामन्यात आला. कोरे अँडरसननं एक अद्भूत आणि अविश्वसनीय असा झेल घेतला. हा झेल बघून क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

Nandkumar Joshi

अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघानं टेक्सास सुपर किंग्जचा १० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. सॅन फ्रान्सिस्को संघानं २० षटकांत ६ विकेट गमावून २०० धावा केल्या होत्या. उत्तरादाखल सुपर किंग्जला ४ बाद १९४ धावाच करता आल्या. हा सामना रोमहर्षक झाला. पण कोण जिंकला, कोण हरला यापेक्षा कोरे अँडरसननं घेतलेला झेल प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील असाच होता. हा झेल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

डलासच्या मैदानावर हा सामना झाला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघानं टेक्सास सुपर किंग्जला पराभूत करत फायनलमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. सॅन फ्रान्सिस्को संघाचा कर्णधार कोरे अँडरसननं सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसचा घेतलेला झेल अद्भूत आणि अविश्वसनीय असाच होता. हा झेल बघून प्रेक्षक हैराण झाले.

दुसऱ्या डावातील पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हा सुपरडुपर झेल बघायला मिळाला. फाफ डू प्लेसिस २२ चेंडूंत ४५ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत २०० धावा केल्या. हे भलंमोठं आव्हान घेऊन मैदानात आलेल्या टेक्सास सुपर किंग्जनं डावाची सुरुवातच जोरदार केली. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. पण पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्यानं विकेट गमावली. कार्मी ले रॉक्स यानं फेकलेल्या चेंडूवर फटका मारायच्या नादात झेलबाद झाला. कोरे अँडरसननं हा झेल टिपला.

तेजतर्रार गोलंदाज कार्मी ले रॉक्स यानं ऑफ साइडला चेंडू फेकला. फाफला फटका मारायचा मोह आवरता आला नाही. त्यानं जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण टायमिंग साधता आलं नाही. फटका मारलेला चेंडू मिड ऑफला हवेत उडाला. कोरे अँडरसन तिथं उभा होता. त्यानं चपळता दाखवत मागे धावून एका हातानं झेल टिपला. कोरे अँडरसनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे कोरे अँडरसन?

कोरे अँडरसन हा न्यूझीलंडचा माजी खेळाडू आहे. अमेरिकेत तो कुटुंबीयांसोबत राहतो. ३३ वर्षीय अँडरसन सध्या यूएएसच्या संघातून खेळतोय. अलीकडेच तो टी २० वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसला होता. बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो मैदानात परतला आहे. अँडरसनचा फिटनेस जबरदस्त आहे. मेजर क्रिकेट लीगमध्ये तो सॅन फ्रान्सिस्को संघाचं नेतृत्व करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT