Shubman Gill water purifier saam tv
Sports

Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

Shubman Gill water purifier: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार शुभमन गिलने आपल्या आरोग्याची काळजी घेत हॉटेलच्या खोलीत तब्बल ३ लाख रुपये किंमतीचा वॉटर प्युरिफायर बसवलाय.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेटच्या टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल सध्या चर्चेत आहे. यावेळी त्याचा खेळ नाही तर तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजममध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यासाठी तो इंदूरला ₹3 लाख किमतीचा वॉटर प्युरिफायर घेऊन गेल्याची माहिती आहे. इंदूरमध्ये सध्या विषारी पाण्यामुळे २३ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

त्यामुळे शुभमनने त्याच्या हॉटेलच्या खोलीत हा वॉटर प्युरिफायर बसवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ज्या शहरात जाते त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल्समध्ये राहाते. अशा मोठ्या हॉटेल्समध्ये पॅक्ड केलेलं पाणी देण्यात येतं. मात्र असं असूनही शुभमनने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्याने हा वॉटर प्युरिफायर स्वतःसोबत नेलाय.

२३ लोकांना गमवावा लागला जीव

डिसेंबर २०२५ च्या अखेरीस आणि यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात इंदूरच्या भागीरथपुरा भागात पाण्याचं गंभीर संकट निर्माण झालंय. यामध्ये एका ठिकाणचं दूषित सांडपाणी शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात मिसळलं गेलं. ज्यामुळे रोगराई वाढली असून तब्बल २३ लोकांचा मृत्यू झाला.

नर्मदा पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळतीमुळे हे संकट ओढावल्याची माहिती आहे. तपासानुसार असं समोर आलंय की, पाईपलाईनचा तुटलेला भाग सांडपाण्याच्या पाईपलाईन किंवा सार्वजनिक शौचालया अगदी जवळ गेला होता. यामुळे पिण्याच्या पाण्यात विष्ठा आणि इतर धोकादायक बॅक्टेरिया पसरून ते दूषित झालं. यामुळे हजारो लोकांना पिण्यासाठी अनेक दिवस दूषित पाणी मिळालंय.

दरम्यान यामध्ये लोकांनी पाण्याचा रंग आणि गंध बदलला असल्याची तक्रार दिली. यानंतर अतिसार, उलट्या आणि डिहायड्रेशनच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, जवळची रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांच्या रांगा लागल्या आणि ते भरून गेलं.

यानंतर १,४०० हून अधिक लोक बाधित झाले त्यापैकी शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी दूषित पाण्यामुळे काही मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र त्यानंतर मृतांचा आकडा वाढला होता.

आज रंगणार तिसरा वनडे सामना

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. यानंतर तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया इंदूरला रवाना झाली. पहिला सामना जिंकल्यानंतर, राजकोटमध्ये भारताचा पराभव झाला. डॅरिल मिशेलने शानदार शतक झळकावून भारताला सात विकेट्सनी पराभूत केलं. इंदूरमधील हा वनडे सामना पुढील पाच महिन्यांतील भारताचा शेवटचा सामना असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अॅक्टिव्हि मोडमध्ये

Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, किंमत ३ लाखांच्या पुढे

Winter Hair Care: थंडीत केस खूप गळतायेत? अंड्याचा करा असा वापर; केस होतील मजबूत आणि काळेभोर

A.R Rahman: 'मला कधीही कोणालाही दुखवायचं...'; ए.आर. रहमान यांनी बॉलीवुड 'धार्मिक राजकारण' वादावर दिलं स्पष्टीकरण

ZP Election : झेडपीसाठी या जिल्ह्यात युतीची घोषणा, भाजप अन् शिंदेसेना किती जागा लढणार?

SCROLL FOR NEXT